आजचा अभिजीत मुहूर्त -
हिंदू कॅलेंडरनुसार, आज 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:11 ते 12:54 पर्यंत अभिजीत मुहूर्त तयार होईल.
Ram Mandir: मर्यादा पुरुषोत्तम! प्रभु श्रीरामाच्या जीवनातील हे 7 गुण आचरणात आणा
अभिजीत मुहूर्तावर काय करावं-
1. सूर्याला जल अर्पण करा - अभिजीत मुहूर्तावर सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ आहे.
advertisement
2. भूमिपूजन करा - अभिजीत मुहूर्तावर भूमिपूजन केल्यानं जमीन समृद्ध होते.
3. कोणतंही नवीन काम सुरू करणं - यावेळी कोणतंही नवीन काम सुरू करणे शुभ असतं.
4. पैशांची गुंतवणूक - अभिजीत मुहूर्तावर पैसे गुंतवले तर फायदा होतो.
5. घरी पूजा करणे - अभिजीत मुहूर्तावर घरी पूजा करणे देखील शुभ मानले जाते.
6. विवाह कार्य - या काळात विवाह किंवा विवाहाशी संबंधित कार्ये यशस्वी होतात.
7. मुंडन संस्कार - लहान मुलांच्या मुंडन संस्कारासाठी अभिजीत मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो.
8. गृहप्रवेश - अभिजीत मुहूर्तामध्ये केल्याने घरात शांती आणि सौहार्द राहते.
9. व्यवसाय सुरू करणे - यावेळी व्यवसाय सुरू केल्याने तुम्हाला नफा मिळू शकतो.
10. धार्मिक विधी - अभिजीत मुहूर्तावर धार्मिक विधी करणे खूप फायदेशीर मानले जाते.
अभिजीत मुहूर्त म्हणजे काय?
धार्मिक मान्यतांनुसार, अभिजीत मुहूर्त हा दिवसातील सर्वोत्तम किंवा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार अभिजीत मुहूर्तामध्ये एखाद्या व्यक्तीने कोणतेही काम सुरू केले तर त्या कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते.
जय श्रीराम! आज प्राण-प्रतिष्ठापनेचा दिवस! घरी अशी करा पूजा, मंत्र, आरती, शुभ योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)