TRENDING:

अशीही भक्ती, आई म्हणते बाळाला जन्म देईन तर 22 जानेवारीलाच! डॉक्टरांनाही काही सूचेना

Last Updated:

ज्योतिषशास्त्रानुसार बाळाची जन्मवेळ आणि मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व असतं. या वेळेवरूनच त्याच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. त्यामुळे शुभ मुहूर्तावर बाळाचा जन्म होणं लाभदायी मानलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी
श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अत्यंत दुर्मीळ योग निवडण्यात आलाय, म्हणूनच या मुहूर्तावर आपल्या बाळाचा जन्म व्हावा अशी आईची इच्छा आहे.
श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अत्यंत दुर्मीळ योग निवडण्यात आलाय, म्हणूनच या मुहूर्तावर आपल्या बाळाचा जन्म व्हावा अशी आईची इच्छा आहे.
advertisement

कानपूर : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भगवान श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होतील. या सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज आहेच, शिवाय संपूर्ण देशभरातही आनंदाचं वातावरण आहे. राम मंदिराच्या कणाकणात भारताच्या विविधतेतील एकता पाहायला मिळेल. देशातील सर्वोत्तम वस्तूंचं आणि कलाकृतींचं दर्शन या मंदिरात घडेल. तसंच अत्यंत भव्य असा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. अशातच एक आगळीवेगळी भक्ती पाहायला मिळतेय.

advertisement

आई आपल्या बाळाला नऊ महिने पोटात बाळगते. त्याने सुखरूपपणे या जगात यावं अशीच तिची इच्छा असते. अशातच एका ठिकाणी आईने चक्क श्रीरामांवरील श्रद्धेपोटी आपल्या बाळाचा जन्मही 22 जानेवारीला व्हावा, अशी इच्छा मनाशी बाळगली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील ज्या ज्या गरोदर महिलांची प्रसूती जानेवारी महिन्यात होणं अपेक्षित आहे, त्यांनी आमची प्रसूती कृपया 22 जानेवारीला होऊद्या, अशी विनंती डॉक्टरांना केली आहे. श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या बाळासाठी आयुष्यभर अविस्मरणीय राहावी, अशी त्यांची इच्छा आहे.

advertisement

बोला...जय श्री राम! जिकडे तिकडे चर्चा, प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता; नेमकं आहे तरी कसं मंदिर?

कानपूरच्या जीएसवीएम मेडिकल कॉलेजअंतर्गत असलेल्या जच्चा बाल रुग्णालयात अनेक गरोदर महिलांनी ही मागणी घेऊन डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टर सीमा द्विवेदी यांनी सांगितलं की, ज्या महिलांच्या प्रसूतीची तारीख 22 जानेवारीच्या जवळपास आहे, त्यांनी याच दिवशी आपली प्रसूती व्हावी, असा आग्रह केलाय. आतापर्यंत अशा 15 महिला याठिकाणी आल्या. शिवाय शहरातील अनेक खासगी रुग्णालयांतूनदेखील अशा घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, या महिलांची ही मागणी ऐकून डॉक्टरही विचारात पडले आहेत.

advertisement

हातात मारुतीरायाचा झेंडा, अंगात बुरखा; त्या पायी निघाल्या अयोध्येला!

श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस अत्यंत शुभ

ज्योतिषशास्त्रानुसार बाळाची जन्मवेळ आणि मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व असतं. या वेळेवरूनच त्याच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. त्यामुळे शुभ मुहूर्तावर बाळाचा जन्म होणं लाभदायी मानलं जातं. तर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अत्यंत दुर्मीळ योग निवडण्यात आलाय, म्हणूनच या मुहूर्तावर आपल्या बाळाचा जन्म व्हावा अशी प्रत्येक आईची इच्छा आहे.

advertisement

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/अध्यात्म/
अशीही भक्ती, आई म्हणते बाळाला जन्म देईन तर 22 जानेवारीलाच! डॉक्टरांनाही काही सूचेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल