नर्मदापुरम : ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रह, ताऱ्यांच्या चालबदलाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. त्यातून काही राशींचं नशीब उजळतं, तर काही राशींच्या नशिबात अंधार पसरतो. आता शुक्र ग्रहामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे, तर शनी ग्रहामुळे निर्माण होणाऱ्या शश राजयोगामुळे काही राशींचं नशीब पालटणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, शिवाय करियरमध्येही यश मिळेल.
advertisement
ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ठराविक वेळेत जेव्हा ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव थेट मानवी जीवनावर होतो. आता तब्बल 500 वर्षांनी दोन राजयोग निर्माण होणार असल्याने याचा कोणत्या राशींना फायदा होणार, पाहूया.
शनिवारी चुकूनही करू नका 'या' 5 वस्तूंची खरेदी; एवढ्या अडचणी येतील की, डोकं वर नाही निघणार!
तूळ : आपल्यासाठी मालव्य आणि शश राजयोग लाभदायी ठरतील. शनी देव आपल्या राशीच्या पंचम भावात आहेत, तर शुक्र सहाव्या भावात आहे. त्यामुळे दाम्पत्याला मुलांकडून शुभवार्ता कळतील. शिवाय आपला स्वामी ग्रह शुक्र असल्याने अधिक लाभ होईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. बुद्धीचा चांगला विकास होईल. चांगले निर्णय घेऊ शकाल. आपलं व्यक्तिमत्त अधिक प्रभावी होईल. प्रेमसंबंध असल्यास विवाह जुळण्याची शक्यता आहे.
अप्सरेसारखी सुंदर बायको हवी? मग ही संक्रांत चूकवू नका! फक्त 1 दान बदलेल तुमचं आयुष्य
कुंभ : या राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य आणि शश राजयोग अनुकूल ठरेल. आपल्या कुंडलीत शुक्र ग्रहाचं धन भावावर भ्रमण सुरू आहे. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व आणखी प्रभावी होईल. शिवाय करियरमध्ये प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. अचानक धनलाभही होऊ शकतो.
मिथुन : या राशीच्या व्यक्तींसाठी व्यापार किंवा व्यवसायात मालव्य आणि शश राजयोगाचा फायदा होईल. शनीदेव आपल्या राशीपासून नवव्या भावात विराजमान आहे, तर शुक्र ग्रहाचं बाराव्या भावात भ्रमण सुरू आहे. त्यामुळे करियर, नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. नशिबाचीही चांगली साथ मिळेल. ध्येयप्राप्तीसाठी मेहनत कराल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g