ज्या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा शनिदोषाचा प्रभाव आहे, त्यांनी गाडी जपून चालवावी. खोटे बोलणे, लबाडी, फसवणूक, चोरी, दारू, जुगार, व्याभिचार इत्यादींपासून दूर राहावे. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात.
शनीची साडेसाती, शनिदोषाचा त्रास होऊ नये म्हणून 4 उपाय
जर तुमच्यावर साडेसाती किंवा धैय्याचा प्रभाव असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी उपवास करून शनि महाराजांची पूजा करावी. शनिदेवाच्या कृपेने साडेसाती आणि धैय्याचे दुष्परिणाम कमी होतील. तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील.
advertisement
शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण करावे. साडेसाती आणि धैय्या राशीत असलेल्या लोकांनी दररोज या स्तोत्राचे पठण करू शकता. दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी राजा दशरथ यांनी सर्वप्रथम शनिस्तोत्राचे पठण केले होते.
जानेवारीत सूर्य-मंगळासह 4 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन; या 3 राशींचा गोल्डन टाईम
साडेसाती आणि धैय्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन छायादान करा. त्यासाठी स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल भरा. मंदिरात जाऊन त्यात आपली सावली पहा. त्यानंतर ते तेल गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा.
शनिदेवाचे आवडते झाड शमी आहे. शनिवारी शमीच्या झाडाची सेवा करा. त्याच्या मुळास पाणी द्या आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनीच्या बीज मंत्राचा ओम शं शनैश्चराय नम: जप दररोज किमान 3 वेळा करावा. दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावे.
सगळी संकटं अचानक अंगावर! 138 दिवसांचा तो काळ या राशींना त्रासाचा, जगणं नकोस करेल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)