दान करण्याचे हे आहेत नियम
ज्योतिषी हेमंत बरुआ यांनी सांगितलं की, शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईच्या 10 टक्के दान दिलं पाहिजे. पण हे दान देताना स्वतःला किंवा कुटुंबाला त्रास होईल असं दान देणं अजिबात योग्य नाही. याशिवाय, तुम्ही स्वतः जाऊन दान दिल्यास तुम्हाला जास्त फळ मिळतं. एखाद्याला घरी बोलावून दान देणं हे सर्वात उत्तम मानलं जातं. पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती आणि ग्रहण यांसारख्या विविध शुभ मुहूर्तांवर दान देण्याचा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने दान देणं विशेष शुभ मानलं जातं.
advertisement
या गोष्टींचं दान करावं
तसंच, शास्त्रानुसार, श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणभोजन घालणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक वर्षाने त्या व्यक्तीच्या वस्तू दान करायच्या असतात, त्या दिवशी कोणतंही दान करू नये. सूर्यास्तानंतर दान देणं हे तर पूर्णपणे अशुभ मानलं जातं. सूर्यास्तानंतर दिलेलं कोणतंही दान वाईट शक्तींना अर्पण केल्यासारखं होतं. कुंडलीतील ग्रहांची स्थिती खराब असताना दान देऊ नये. शनी आणि चंद्र कमजोर स्थितीत असतील तर दान देऊ नये. दान देताना हे तीन ग्रह अस्थिर असतात आणि वाईट फळ देतात. शनीला मजबूत करण्यासाठी तेलाचं दान करावं, पण स्वयंपाक करून उरलेलं किंवा खराब झालेलं तेल दान करू नये.
हे ही वाचा : या मंदिरात भक्तांना नाही प्रवेश; पुजारीही डोळे आणि तोंड झाकून करतो पूजा! यामागचं कारण काय?
हे ही वाचा : खर्च नाही, पूजा नाही... फक्त 1 फोटो दूर करते तुमच्या घरातील वास्तुदोष; जाणून घ्या फोटोमागचे अद्भुत रहस्य!