मिर्झापूर : श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो, त्यामुळे या काळात महादेवांची आवर्जून पूजा केली जाते. श्रावणात शिवलिंग स्थापन करणंही शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर भरभराट होते. मात्र अनेकदा कळत-नकळतपणे आपल्याकडून देवपूजेबाबत काही चुका होतात, ज्यामुळे अडचणी वाढू शकतात. शिवलिंगाची स्थापना करतानाही काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
महंत योगानंद गिरी सांगतात की, वास्तूशास्त्रानुसार घरात केवळ एकच शिवलिंग असायला हवं. एकापेक्षा अधिक शिवलिंग घरी ठेवू नये. शिवाय या शिवलिंगाचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. साधारण 4 इंचापेक्षा मोठं शिवलिंग घरात ठेवू नये.
5 प्रकारचं शिवलिंग घरी करू शकतो स्थापित!
महंत योगानंद गिरी यांनी सांगितलं की, नर्मदेश्वर, पारद, स्फटिक, रजत आणि सुवर्ण यापैकी कोणतंही शिवलिंग आपण घरी स्थापित करू शकतो. नर्मदेश्वर शिवलिंग अंगठ्याच्या पुढील भागाएवढं असायला हवं. त्याची पूजा करणं लाभदायी मानलं जातं. असं म्हणतात की, नर्मदेश्वर शिवलिंगाच्या कणाकणात शिव आहेत. तसंच पारद शिवलिंगाची पूजाही खास मानली जाते. शिवाय स्फटिक, रजत आणि सुवर्ण शिवलिंगाच्या पूजेलाही महत्त्व आहे.
हेही वाचा : शिवलिंगावर नेमके किती बेलपत्र अर्पण करावे? ज्योतिषांनी सांगितलं अंकगणित
भाविकांनी पहाटे महादेवाची पूजा केल्यास त्यातून विशेष पुण्य मिळतं असं म्हणतात. घरात किंवा मंदिरात गंगेचं पाणी आणि बेलपत्र महादेवांना अर्पण केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.