Shravan: शिवलिंगावर नेमके किती बेलपत्र अर्पण करावे? ज्योतिषांनी सांगितलं अंकगणित
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सर्वात आधी ते स्वच्छ धुवून घ्यावं, ते तुटलेलं असायला नको. शिवाय ते अर्पण करताना...
परमजीत, प्रतिनिधी
देवघर : ज्योतिषशास्त्रात 12 महिन्यांमध्ये श्रावण हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. हा महिना महादेवांना समर्पित असल्यानं या काळात त्यांची मनोभावे पूजा केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. त्यामुळे या महिन्यात महादेवांना त्यांचे प्रिय पदार्थ अर्पण केले जातात. बेलपत्रही त्यापैकीच एक.
महादेवांना रुद्राभिषेक करताना 108 बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर 21 किंवा 51 बेलपत्र अर्पण करणंही शुभ मानलं जातं. याबाबत ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी माहिती दिली आहे.
advertisement
ज्योतिषी सांगतात, 108 अंक हा ब्रह्मांडीय ऊर्जा आणि अनंताचा प्रतीक मानला जातो. 1 म्हणजे ईश्वर, 0 म्हणजे पूर्णत्व आणि 8 म्हणजे अनंत. त्यामुळे माळसुद्धा 108 वेळा जपली जाते. वेद आणि उपनिषदांमध्ये या अंकाचा उल्लेख आहे. हा अंक अतिशय पवित्र मानला जातो. ज्योतिषांनी असंही सांगितलं की, 21 किंवा 51 बेलपत्र अर्पण केल्यानं ग्रहदोष दूर होतात. परंतु त्यापेक्षाही 108 अंक शुभ मानला जातो.
advertisement
बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सर्वात आधी ते स्वच्छ धुवून घ्यावं, ते तुटलेलं असायला नको. शिवाय ते अर्पण करताना ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर 108 बेलपत्र अर्पण केल्यानं महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते असं म्हणतात. परिणामी आयुष्यात सुख, शांती समृद्धीचं आगमन होतं. येत्या 5 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होतोय. आपण महादेवांना 21, 51 किंवा 108 बेलपत्र अर्पण करू शकता, असं ज्योतिषांनी सांगितलं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Deoghar,Jharkhand
First Published :
July 31, 2024 6:41 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan: शिवलिंगावर नेमके किती बेलपत्र अर्पण करावे? ज्योतिषांनी सांगितलं अंकगणित