ग्रहणाच्या घटनेला ज्योतिषशास्त्रात आणि खगोलशास्त्रात सारखंच महत्त्व दिलं जातं. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक मानलं जातं. त्यामुळे जेव्हा सूर्याशी संबंधित घडामोड होते तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर राहणाऱ्या प्राण्यांवर होतो. या ग्रहणाचा सुतक कालावधी, ग्रहणाचा प्रकार आणि ग्रहणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं. आज होणारं सूर्यग्रहण हे कंकणाकृती प्रकारचं आहे. अशा प्रकारच्या ग्रहणादरम्यान चंद्र पृथ्वीपासून दूर असतो. त्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी चंद्राच्या पाठीमागे सूर्याची वर्तुळाकार कड दिसते.
advertisement
अश्विन कृष्ण पक्षातील आमावस्या तिथीच्या दिवशी होणारं हे सूर्यग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी संपेल. या सूर्यग्रहणाचा मध्यकाळ 12 वाजून 15 मिनिटांनी असेल. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. म्हणजेच या ग्रहणाचा आपल्यावर शारीरिक, आध्यात्मिक, सुतक परिणाम होणार नाही. या ग्रहणादरम्यान, भारतात राहणाऱ्या सर्व लोकांनी आपल्या नियमित दिनचर्येचं पालन करावं.
हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, आर्क्टिक, चिली, पेरू, होनोलुलू, अंटार्क्टिका, अर्जेंटिना, उरुग्वे, ब्युनोस आयर्स, बेका बेट, फ्रेंच पॉलिनेशिया महासागर, उत्तर अमेरिकेचा दक्षिण भाग, फिजी, न्यू चिली, ब्राझील, मेक्सिको आणि पेरूमध्ये काही ठिकाणी दिसेल.
सूर्यग्रहणाचा परिणाम
यावेळी सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे. ग्रहणाच्या वेळी राहूची पूर्ण दृष्टी सूर्यावर असेल. याशिवाय शनिसोबत सूर्याचा षडाष्टक योगही तयार होईल आणि केतुही सूर्याच्या घरामध्ये असेल. याशिवाय, ग्रहण काळात सूर्य, चंद्र, बुध आणि केतू यांचा संयोग होईल. राहू आणि केतूचा अक्ष मीन आणि कन्या राशीत प्रभावशाली होईल. यामध्ये सूर्य, मंगळ आणि केतू यांचा प्रभाव असेल.
ही परिस्थिती जगभरात गंभीर राजकीय गोंधळ निर्माण करू शकते. शेअर मार्केट आणि जगभरातील आर्थिक परिस्थिती डळमळीत होऊ शकते. कन्या आणि मीन राशीचा प्रभाव जगभरात युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती दर्शवत आहे.