TRENDING:

Swapna Shastra: जर तुम्हाला स्वप्नात स्वतःचा मृत्यू, साप चावलेला दिसला तर त्याचा हा अर्थ होतो!

Last Updated:

Swapna Shastra: हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही कारण आणि अर्थ नक्कीच असतो. यानुसार काही स्वप्नं शुभ संकेत देतात, तर काही येणाऱ्या वाईट काळाबद्दल वॉर्निंग देतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
स्वप्नशास्त्राबद्दल बोलायचे झाल्यास अशी स्वप्ने आपल्याला काही संकेत देतात, परंतु आपल्याला हे संकेत समजत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नांचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो. स्वप्नं आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे निर्देश दर्शवतात. स्वप्नांच्या शुभ आणि अशुभ परिणामांचा उल्लेख स्वप्नशास्त्रात आहे.
News18
News18
advertisement

सप्टेंबर महिन्यातलं चंद्रग्रहण भारतातून दिसेल का? जाणून घ्या ग्रहणाचा कालावधी

1. सर्पदंश हिंदू धर्मग्रंथांमध्ये जरी साप हे काळाचे रूप मानले गेले असले तरी स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात साप चावला तर याचा अर्थ तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे.

advertisement

2. स्वत:चा मृत्यू पाहणे - स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात तुमचा स्वतःचा मृत्यू दिसला, तुमचे रक्त बाहेर पडताना दिसले, साप चावताना किंवा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसले किंवा पाऊस दिसला, याचा अर्थ तुमची काही मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. याशिवाय देवाचे दर्शन होणे, पूर्वज, भाऊ, बहीण किंवा नातेवाइकांचे स्वप्नात दर्शन होणे शुभ मानले जाते.

advertisement

3. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पाहणे - स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात मृत्यू दिसणे, स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचे स्वप्न पाहिल्यास प्रसिद्धी आणि प्रगती होते. मृतदेह पाहणे, हत्ती आणि घोडे तुमचा पाठलाग करताना दिसणे हे काही मोठे सन्मान किंवा पदोन्नती मिळण्याचे लक्षण आहे, असे मानले जाते.

4. स्वतःचे दात पडल्याचे पाहणे - जर तुम्हाला स्वप्नात तुमचे दात पडलेले किंवा नखे​कापताना दिसले तर ते तुमचे गरीबी दूर होण्याचे लक्षण मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखादी सुंदर स्त्री किंवा अप्सरा दिसली तर ते तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणीशी सलोख्याचे संबंध राहण्याचे लक्षण आहे.

advertisement

Ganesh Chaturthi 2024: यावर्षी गणेश चतुर्थी 4 शुभ योगांमध्ये साजरी होणार, जाणून घ्या पूजा साहित्य, मुहूर्त

5. ट्रेन किंवा जहाज पाहणे - स्वप्नात ट्रेन किंवा जहाज पाहणे म्हणजे तुम्ही प्रवासाला जाऊ शकता. याशिवाय हिरवीगार बाग, हिरवेगार शेत पाहणे म्हणजे तुमची चिंता आणि तणावातून लवकरच सुटका होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Swapna Shastra: जर तुम्हाला स्वप्नात स्वतःचा मृत्यू, साप चावलेला दिसला तर त्याचा हा अर्थ होतो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल