TRENDING:

आता नाशिकमध्येच घ्या केदारनाथ दर्शन, अंजनेरी पर्वतरांगेत आहे हे ठिकाण

Last Updated:

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती नाशिक जिल्ह्यात अंजनेरी पर्वतरांगेत साकारण्यात आली आहे. हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक, 13 सप्टेंबर : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जात असतात. पण अनेकांना केदारनाथला जाणं शक्य होत नाही. पण आता नाशिकमध्येच केदारनाथाचं दर्शन होऊ शकते. वाढोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरुपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर हे पुणे (Pune) येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून साकारण्यात आलंय. अंजनेरी पर्वतरांगेत हे मंदिर असून प्रतिकेदारनाथ ( prati kedarnath temple ) म्हणून अलीकडे हे मंदिर प्रचलित झाले आहे. सध्या भाविकांचे हे मंदिर मुख्य आकर्षण ठरत आहे.
आता नाशिकमध्येच घ्या केदारनाथ दर्शन, अंजनेरी पर्वतरांगेत आहे हे ठिकाण
आता नाशिकमध्येच घ्या केदारनाथ दर्शन, अंजनेरी पर्वतरांगेत आहे हे ठिकाण
advertisement

अंजनेरी पर्वतरांगेतील या मंदिराचे काम 2014 साली पूर्ण झाले. तेव्हा पासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र, तेव्हा मंदिराचा फार प्रचार प्रसार झाला नव्हता. अनेकांना हे मंदिर माहितीही नव्हतं. पण 2022 च्या सुरुवातीलाच मंदिराचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रतिकेदारनाथ मंदिर नावाने प्रचंड व्हायरल झाले. तेव्हापासून परिसरात प्रथमच असे मंदिर असल्याचे भाविकांना माहिती झाले. आता शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

advertisement

Video : अयोध्येतील राम मंदिराची पुणेकरांना पर्वणी, पाहा दगडूशेठच्या देखाव्याचा फर्स्ट लुक

मंदिरापर्यंत कसे पोहोचाल?

मंदिरात जाण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना वाढोली फाटा आहे. त्या फाट्यावरून डाव्या हाताला वळल्यानंतर 3 किलोमीटर अंतरावर वाढोली गावं आहे. गावातून पुढे मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. तसेच अंजनेरी फाट्यावरून देखील मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. नाशिक शहर ते प्रतिकेदारनाथ मंदिर हे अंतर साधारण 30 किलोमीटर आहे. खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही जाऊ शकता.

advertisement

भारत-पाक बॉर्डरवर जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव, 14 वर्षांपासून आहे मुंबईशी कनेक्शन

भक्त निवासाची व्यवस्था

अंजनेरी पर्वत रांगेत चार एकरच्या जागेत हे मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिर परिसरात भक्त निवास, भागवत पूज्यपाद, शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्वरी मंदिर आहे. सामान्य नागरिकांमध्ये आध्यात्मविद्येचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे मंदिर स्थापन करण्यात आले आहे. मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर दर्शन बंद केलं जातं कारण मंदिर परिसरात पूर्णतः जंगल आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर लवकर बंद केले जाते.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
आता नाशिकमध्येच घ्या केदारनाथ दर्शन, अंजनेरी पर्वतरांगेत आहे हे ठिकाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल