भारत-पाक बॉर्डरवर जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव, 14 वर्षांपासून आहे मुंबईशी कनेक्शन

Last Updated:

भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवरही भारतीय सैनिक गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात.

+
News18

News18

मुंबई, 13 सप्टेंबर : गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मुंबईसह संपूर्ण देशभर त्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात सुरू झालेला हा उत्सव आता जगभर साजरा केला जातो. अगदी काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवरही भारतीय सैनिक गणेशोत्सव साजरा करतात.  भारत - पाकिस्तान सीमेवरील राजा अर्थान 'किंग ऑफ एलओसी’ म्हणून ओळखला जाणारा जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथील गणपती बाप्पा मुंबईहून रवाना झालाय.
पूँछमध्ये विराजमान होणारी ही सहा फुटाची गणेशमूर्ती कुर्ला येथील दिव्यांग मुर्तीकार विक्रात पांढरे यांच्या गणेश चित्र शाळेत घडवली आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणून मानवाधिकार कार्यकर्त्या किरण बाला इशर (ईशरदीदी) आणि शिवनेर सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक छत्रपती आवटे यांच्या पुढाकारानं हा गणेशोत्सव करण्यात येतो.
advertisement
गेल्या 14 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी कोरोना काळातही भारत-पाक सीमेवर हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मुंबई ते जम्मू रेल्वेनं आणि जम्मू रेल्वे स्टेशनपासून पुढे 300 किलोमीटर दूर दूर्गम भागात ट्रकनं पूंछ गावात बाप्पा नेण्यात येतो, अशी माहिती ईशरदीदी यांनी दिली.
advertisement
भारत- पाक सीमेवर पुंछ सीमारेषा ही भारतातील पीरपंजाल या पर्वत श्रृंखलेतील भाग आहे. या पर्वतीय भागात जंगली जनावरांनी भरलेल्या घनदाट जंगलात,. आपले सैनिक या सर्व नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन देशाचं संरक्षण करतात.  या परिस्थीतीही दरवर्षी प्रमाणे गणेश उत्सव साजरा करणार असा विश्वास सैनिकांना आहे, “सैनिकांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास ईशरदीदींनी व्यक्त केला.
advertisement
मराठी बातम्या/मुंबई/
भारत-पाक बॉर्डरवर जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव, 14 वर्षांपासून आहे मुंबईशी कनेक्शन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement