उज्जैन : आज प्रेमाचा दिवस अर्थात 'व्हॅलेंटाईन्स डे'. सोबतच आज आहे वसंत पंचमी. या दिवशी सरस्वती देवीची मनोभावे पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रात वसंत पंचमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी कामदेव आपली पत्नी रतीसोबत पृथ्वीवर आले होते असं मानलं जातं. कामदेव प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम निर्माण करतात. म्हणूनच वसंत पंचमीला त्यांची आणि त्यांच्या पत्नीचीही पूजा केली जाते. ज्यांच्या आयुष्यात प्रेम नसेल, दाम्पत्य जीवनात गोडवा नसेल, त्यांनी ही पूजा करावीच.
advertisement
Valentine's Day: व्हॅलेंटाईन डे स्पेशल! प्रेमाच्याबाबतीत लकी असतात या 5 राशींचे लोक
विवाह जुळण्यात येत असतील अडचणी तर...
ज्यांचं लग्न काही केल्या जुळत नसेल, मनासारखा जोडीदार मिळत नसेल, त्यांनी कामदेव आणि रतीची मनोभावे पूजा करावी. ही पूजा विधीवत केल्यास आयुष्यात भरपूर प्रेम येतं आणि प्रेमासंबंधित सर्व अडचणी दूर होतात.
शनी सूर्यासोबत येणार 'या' राशीत, फायदा मात्र होणार दुसऱ्यालाच, कदाचित तुमचंही उजळू शकतं नशीब!
महादेवांनी केली होती कामदेवांची राख
पंडित आनंद भारद्वाज सांगतात की, एकदा महादेव प्रचंड क्रोधीत झाले होते. रागात त्यांनी कामदेवांची राख केली. तेव्हा रतीने त्यांच्याकडे कामदेवांना सुदृढ परत आणण्याची मागणी केली. त्यावेळी महादेवांनी सांगितलं की, कामदेव भावनेच्या स्वरूपात जिवंत राहतील. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांच्या पुत्राच्या म्हणजेच प्रद्युम्नच्या रूपात त्यांना शरीरप्राप्ती होईल.
कशी करावी कामदेवांची पूजा?
आज वसंत पंचमीच्या दिवशी स्नान करून कामदेव आणि रतीची पूजा करण्याची प्रथा आहे. दोन्ही जोडीदारांनी एकत्र कामदेव आणि रतीला पिवळी फुलं, गुलाब, अक्षता, पान, सुपारी, अत्तर, चंदन, माळ, फळं, मिठाई आणि साज-शृंगार अर्पण करावा. ज्यांचं लग्न जुळण्यात अडचणी येत असतील त्यांनी रतीला 16 शृंगाराचे साहित्य अर्पण करावे.
पूजेच्यावेळी करावा 'हा' मंत्रजप
आपली लव्ह लाइफ हेल्थी राहावी, आयुष्यात कायम रोमान्स राहावा यासाठी कामदेवांची पूजा करताना ‘कामोअनंग पंचशराः कंदर्प मीन केतनः।। श्री विष्णुतनयो देवः प्रसन्नो भवतु प्रभो।।’ हा मंत्रजप 108 वेळा करावा. त्यामुळे आपली लव्ह लाइफ अगदी आपल्या मनासारखी होईल. दाम्पत्य जीवनात प्रचंड सुख येईल, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
