देवघर : ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात ग्रहांचा राशीप्रवेश तर प्रचंड महत्त्वाचा मानला जातो, कारण त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. मग काही राशींसाठी हा प्रवेश सकारात्मक ठरतो, तर काही राशींसाठी नकारात्मक. म्हणजेच ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीबदलाचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असतो. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एकाच राशीत दोन ग्रहांची युती होते तेव्हा एखादा शुभ योग निर्माण होतो. परंतु हे योग सर्वच्या सर्व 12 राशींसाठी लाभदायी नसतात.
advertisement
आता बुध आणि गुरूच्या युतीमुळे नवपंचम योग तयार होणार आहे. या योगाचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल आणि कोणत्या राशींच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होईल, पाहूया. याबाबत झारखंडच्या देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार नवपंचम योग 3 राशींच्या आयुष्यात सुख घेऊन येईल.
Life Changing Habits : आजच या 5 गोष्टी करायला सुरुवात करा, तणाव वगैरे सर्व गोष्टी होतील दूर
मिथुनः आपल्याला जमीन, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जे बऱ्याच काळापासून लग्नाची वाट पाहताहेत त्यांचं या योगामुळे लग्न जुळण्याची शक्यता आहे. करियर आणि व्यवसायातही यश मिळेल. शिवाय कुंटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
सूर्याचा उत्तरायण सुरू, आता शुभ कार्य होतील; तुमच्या राशीला हा काळ धोक्याचा नाही ना?
कन्याः हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल इतका आपल्याला या योगाचा फायदा होणार आहे. नोकरीत आपली प्रतिष्ठा वाढेल. आपल्याला अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. कुटुंबातील वाद संपतील, वैवाहिक जीवनात सुख येईल.
धनुः या योगामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळेल. ज्यांना लग्न करायचंय त्यांचं लग्न जुळण्याचीही शक्यता आहे. समाजात पदप्रतिष्ठा वाढेल. शिवाय मालमत्ता खरेदी करण्याचाही योग आहे. या काळात केलेल्या गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g