खरगोन : हिंदू धर्मात खरमास सुरू झाल्यावर विवाह सोहळे होत नाहीत. जेव्हा मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो, तेव्हा खरमास संपतो. मग यानंतर काही महिन्यांपर्यंत विवाह तिथी असते. मात्र, यावेळी खरमासनंतर लग्नासाठी 4 महिन्यात फक्त 10 मुहूर्त आहेत.
कधी आहे खरमास -
यावेळी 14 मार्चपासून 13 एप्रिलपर्यंत खरमास चालणार आहे. यामध्ये विवाहाची एकही तारीख नाही. याशिवाय मे आणि जूनमध्येही विवाहासाठी कोणताही मुहूर्त नाही. तसेच एप्रिल आणि जुलैमध्येही जास्त मुहूर्त नाही. असे मानले जाते की, विवाह हा शुभ मुहूर्तावर केल्याने दाम्पत्याचे जीवन हे आनंदात जाते.
advertisement
18 एप्रिलपासून होणार विवाहाला प्रारंभ -
खरगोनचे ज्योतिषाचार्य पंडित पंकज मेहता यांनी लोकल18 याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, खरमास सुरू झाला आहे. 13 एप्रिलपर्यंत तो राहील. यानंतर मेष राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर मंगलकार्य सुरू होतील. नक्षत्रांच्या आधारावर पाहिले तर 18 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत विवाहाच्या तारखा असतील. यानंतर दोन महिने कोणताही मुहूर्त नसेल.
मे, जून मध्ये मुहूर्त नाहीत -
ज्योतिषी यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, वैशाख कृष्ण चतुर्थी 28 एप्रिल पासून आषाढ कृष्ण अमावस्या 5 जुलैपर्यंत तारा अस्त होईल आणि शास्त्रानुसार, शुक्र आणि गुरूच्या अस्ताच्या वेळी लग्नासह कोणतेही शुभ कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे या वर्षी लग्नासाठी शुभ मुहूर्त कमी आहेत. एप्रिलनंतर मे आणि जूनमध्ये शुभ मुहूर्त नाही.
hanuman chalisa : हनुमान चालिसा कधी वाचायला हवी? तुम्हाला 'या' सर्व गोष्टी माहिती नसतील..
हे आहेत लग्नाचे शुभ मुहूर्त -
ज्योतिषी यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, खरमास संपल्यानंतर 18 एप्रिलला लग्नाचा पहिला मुहूर्त असेल. यानंतर 20, 21, 24 आणि 26 एप्रिलला मुहूर्त आहे. 28 एप्रिल रोजी तारा अस्ताआधी पहाटे लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर जुलैमध्ये विवायुक्त नक्षत्राचा उदय झाल्यानंतर पहिला शुभ मुहूर्त 11 जुलै रोजी असेल. यानंतर 12, 13 आणि 14 जुलैला शुभ मुहूर्त आहे. एकंदरीत एप्रिल आणि जुलैमध्ये लग्नासाठी फक्त 10 शुभ मुहूर्त आहेत. याशिवाय लग्नासाठी इतर कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही राशी-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहेत. न्यूज 18 लोकल मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही.