जीवनात आत्मसात करावे असे प्रभू रामाचे 7 गुण -
1.धैर्यवान श्रीराम
प्रभू रामाच्या सात गुणांपैकी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे धैर्यवान किंवा सहनशील. पटकन काहीही साध्य करण्याची अभिलाषा प्रत्येक वेळी काम बिघडू शकते. तुमच्याकडे धैर्य आणि सहनशीलता असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता.
2. दयाळूपणा
प्रभु रामाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच्या मनात मानव आणि प्राण्यांबद्दल दयेची भावना असली पाहिजे. ही गुणवत्ता व्यक्तीची प्रतिमा सुधारते.
advertisement
3. नेतृत्व क्षमता
प्रभु श्रीराम राजा आणि कुशल व्यवस्थापक असूनही सर्वांना बरोबर घेऊन गेले. त्यांच्या या गुणामुळे समुद्रात दगडांनी पूल बांधणे शक्य झाले.
जय श्रीराम! आज प्राण-प्रतिष्ठापनेचा दिवस! घरी अशी करा पूजा, मंत्र, आरती, शुभ योग
4. आदर्श बंधू
भाऊ-बहिण, नात्यात वाद होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. भांडणानंतरही भावा-बहिणींमध्ये परस्पर प्रेम असावं, हा गुण प्रभू रामाकडून शिकायला हवा. आपल्या भावांप्रती त्याचे समर्पण आणि त्याग त्याला एक आदर्श भाऊ बनवतो.
5. मित्रता
प्रभु रामातील मैत्रीचा गुण प्रत्येकानं अंगीकारला पाहिजे. प्रभू रामानं मैत्रीचं नातं मनापासून जपलं होतं. केवट, सुग्रीव, निषादराज आणि विभीषण हे त्यांचे परममित्र होते. मैत्री टिकवण्यासाठी प्रभू रामाने स्वतः अनेक संकटांचा सामना केला.
संध्याकाळी दिव्यांनी उजळेल संपूर्ण देश! घरी अशा पद्धतीनं प्रज्वलित करा रामज्योती
6. दृढ़प्रतिज्ञ (दृढनिश्चियी)
प्रत्येकानं आपल्या जीवनात प्रभू रामाचे निश्चित गुण अंगीकारले पाहिजेत. व्यक्तीमध्ये दृढनिश्चियता असते ती व्यक्ती आयुष्यात नेहमीच यश मिळवते.
7. सद्गुणी
प्रत्येक व्यक्तीने प्रभू रामासारखे सदाचारी असले पाहिजे. त्यांच्या चांगल्या आचरणामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. तुमची चांगली वागणूक आणि आचरण तुम्हाला यशाच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत करते.