जमुई : आज 8 एप्रिल रोजी चैत्र महिन्यातील सोमवती अमावस्या आहे. आज सोमवार असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यावर घरगुती त्रास दूर होतात. तसेच सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होऊ शकते. इतकेच नाही तर सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास पितरांचा मोक्षही होऊ शकतो.
advertisement
ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न झा यांनी लोकल18 बोलताना याबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, आज जर काही उपाय केले तर भगवान शंकर प्रसन्न होऊ शकतात. या दिवशी भगवान शंकराला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. तसेच आज भगवान शंकराला दुधाचा अभिषेक करून दही अर्पण करावे. यामुळे घरातील सर्व प्रकारे त्रास शांत होतात आणि जीवनातील सुख-समृद्धीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
ज्योतिषाचार्य यांनी पुढे बोलताना सांगितले की, आजच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला काही उपाय केल्याने पितरांना मोक्ष सुद्धा दिला जाऊ शकतो. तसेच त्यांची कृपाही मिळू शकते. त्यामुळे या दिवशी सकाळी तर्पण केल्यास आणि तर्पणमध्ये काळे तीळ, पांढरी फुले आणि कुश यांचा वापर केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे वंशवृद्धी होते. तसेच आर्थिक लाभही होतो. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडावर पाणी टाकल्यास पितरांना मोक्ष प्राप्त मिळतो.
वडिलांना पाहून क्रिकेटमध्ये रस, पहिल्याच सामन्यात विराटची विकेट, IPL मधील नवीन स्टार खेळाडू कोण?
या मंत्राचा करावा जप -
सोमवती अमावस्येला जर एक दिवस अशोकाचे झाड लावावे आणि जर त्याची प्रत्येक दिवशी सेवा केली तर असे केल्याने पितरांना मोक्ष मिळू शकतो. ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी किंवा पितरांना मोक्ष मिळावा म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत भगवान विष्णुची पूजा केली जावी. तरीसुद्धा पितरांना मोक्ष मिळू शकतो. याशिवाय या दिवशी भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करून शिवलिंगाचा जलाभिषेक करून बेलच्या झाडाला पाणी द्यावे. यामुळे पितृदोषही दूर होऊ शकतो.
सोमवती अमावस्येचा हा आहे शुभ मुहूर्त -
ज्योतिषाचार्य पंडित शत्रुघ्न आचार्य यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, सोमवती अमावस्येचा मुहूर्त 8 एप्रिल सोमवारी सकाळी 3:11 वाजता सुरू होत असून 8 एप्रिल रोजी रात्री 11.50 पर्यंत राहील.