मेष :-
चंद्र भ्रमण आज दशमस्थानात असून राशीत गुरू राहू योग आहे. मानसिक ताण वाढेल. कामाची जबाबदारी येईल. संतती साठी त्रास दायक असून चंद्र भ्रमण कौटुंबिक संबंध वाढवेल. प्रवास दृष्ट्या उत्तम फळ देईल. दिवस मध्यम.
वृषभ :-
भाग्यस्थानात चंद्र भ्रमण योग आहे. ठरविलेले काम ,अधिकाऱ्यांशी संपर्क होईल. प्रवासात खर्च जपून करा. वैवाहिक जीवनात सांभाळून रहा. घरामध्ये नवीन खरेदी होण्याचे संकेत आहे. संतती संबंधी आणि घरात अडचणी आल्या तरी यश मिळेल. दिवस शुभ. .
advertisement
मिथुन :-
अष्टम स्थानातील चंद्र ,भाग्यात शनि आहे. मंगळ गृह चिंता दूर करेल. शुक्र आर्थिक लाभ देईल. वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. दिवस मध्यम .
कर्क :- भावंडांशी मतभेद असले तरी तुमचे निर्णय त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. आरोग्य जपा असे ग्रह सांगत आहेत. वैवाहिक सुख मिळेल तसेच प्रवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. दिवस चांगला.
सिंह :-
मानसिक ताणतणाव होऊ शकतो. भाग्य स्थानातील गुरुराहू योग धार्मिक बाबीत तणाव निर्माण करेल. वयोवृद्ध मंडळींनी सावध रहा. प्रकृती जपा . षष्ठस्थानातील चंद्र आर्थिक ,कौटुंबिक जीवन, संतती यासाठी फळ देईल. दिवस उत्तम .
कन्या :-
महत्त्वाच्या कामात व्यग्र रहाल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. . चंद्र पंचम स्थानात मध्यम फळ देईल. संतती कडून दुखावले जाल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तणाव राहील .वैवाहिक जीवन मध्यम राहील. दिवस साधारण.. .
तूळ :-
ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. कार्यालयात मन द्विधा करणारी बातमी मिळेल. खर्च आणि नुकसान त्रस्त करतील. प्रवास योग येतील. परदेश संबंधी व्यवहारात यश मिळेल. वैवाहिक जीवनात कलह, गैरसमज होतील. दिवस मध्यम.
वृश्चिक:-
मनावरील ताण दुपार नंतर वाढेल.. नवीन ओळख होईल. रवि दशम स्थानात अधिकारी वर्ग आणि वडिलांकडून सहयोग देईल. आर्थिक लाभ होतील. नाते संबंध जपा. दिवस मध्यम.
धनु :-
रागावर ताबा ठेवा. वैवाहिक जीवनात कलह होण्याची शक्यता आहे. चंद्र आर्थिक लाभ देईल. प्राप्ती होईल पण खर्च ही होईल . कार्यालयीन कामकाज सुरु राहील. प्रवासात जास्त दगदग टाळा. दिवस मध्यम.
मकर:-
कुटुंबात चांगले वातावरण राहील. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम टाळण्याचा प्रयत्न करा.राशीतील चंद्र मंगळ योग आहे .नोकरीत अस्थिर वाटेल. परदेश प्रवास योग येतील. खर्च होतील. दिवस मध्यम.
कुंभ:-
आज प्रकृती विषयी समस्या असतील तर सोडवण्यात वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा. प्रवास योग येतील .आर्थिक व्यय होतील. दिवस मध्यम .
मीन :-
कुटुंबात महत्त्वाची चर्चा होईल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवन ठीक राहील. आर्थिक दृष्ट्या ठीक असून संतती जपा.लाभ चंद्र आहे. घरामधे मुलासोबत वेळ जाईल. दिवस चांगला.
शुभम भवतू!!