सागर : 22 जानेवारीला सर्वत्र जय श्री राम...हाच जयघोष ऐकू येईल, कारण याच दिवशी अयोध्येत भगवान श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. त्या क्षणी आपणही अयोध्येत असावं, अशी प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. आपल्यालाही अयोध्येत जाण्याची ओढ असेल, तर ही बातमी आपल्याचसाठी. केवळ एका फोनवर होऊ शकते आपली ही तीर्थयात्रा पूर्ण.
advertisement
समाजसेवी रामसरोज समूहाद्वारे भाविकांना फ्रीमध्ये अयोध्येत नेण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रवासात भाविकांच्या जेवणापासून राहण्यापर्यंतचा सर्व खर्च समाजसेवी समूहाकडूनच करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला केवळ आपलं आधार कार्ड त्यांच्या कार्यालयात जमा करावं लागेल. सोबतच मोबाईल नंबरही द्यावा लागेल. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील भाविकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
(बोला...जय श्री राम! जिकडे तिकडे चर्चा, प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता; नेमकं आहे तरी कसं मंदिर?)
समाजसेवी समूहाचे संचालक शैलेश केशरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणीत मागील वर्षापासून मोफत तीर्थयात्रेची सुरुवात केली. यात ते वृद्ध आणि गरजू व्यक्तींना तीर्थयात्रेला घेऊन जातात. यंदा ही तीर्थयात्रा अयोध्येची असणार आहे. काही भाविकांना बसमधून नेण्यात येईल, तर काही भाविकांचा रेल्वे प्रवास होईल. शिवाय सर्वांना सुखरूप आपापल्या घरी पाठवण्याची जबाबदारीही त्यांचीच असेल. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी चार दिवस आणि सोहळ्यानंतर चार दिवस अशी ही तीर्थयात्रा असणार आहे.
(कुत्रा घालतोय प्रदक्षिणा, एका महिन्यापासून इथंच, मंदिर सोडून जाईना कुठं!)
सागरमधील रामसरोज पॅलेस किंवा स्टेशन रोडवरील गॅस एजन्सीच्या मागील पार्षद कार्यालय टिळकगंजमध्ये या यात्रेसाठी भाविक आधार कार्ड जमा करू शकतील. महत्त्वाचं म्हणजे या तीर्थयात्रेत सहभागी होण्यासाठी वय, जात, धर्म, लिंग अशी कोणतीही अट नाही.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
