एवढं महत्त्व का?
बागेश्वरचे पंडित कैलाश उपाध्याय लोकल 18 शी बोलताना सांगतात की, ही परंपरा केवळ प्रतीकात्मक नाही, तर त्यामागे एक खोल धार्मिक श्रद्धा आणि जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. असं मानलं जातं की, जेव्हा मुलगा संन्याशाचं रूप धारण करतो, तेव्हा तो जगाच्या बंधनातून वर उठून शुद्धता आणि अध्यात्माकडे वाटचाल करतो. काही काळासाठी घेतलेला संन्यास हे दाखवून देतो की, जीवन केवळ भौतिक सुखांपुरते मर्यादित नाही, तर त्याला आध्यात्मिक जबाबदाऱ्याही आहेत. स्थानिक ज्येष्ठांच्या मते, या प्रक्रियेमुळे मुलामध्ये मानसिक परिपक्वता येते आणि तो जबाबदार बनतो.
advertisement
दुसरा जन्म!
पवित्र जानवं (जाणवे) धारण करणं हे स्वतःच एक मोठं धार्मिक पाऊल आहे. हे मुलाच्या 'दुसऱ्या जन्माचं' प्रतीक मानलं जातं, ज्यात तो आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांसह जीवनाकडे वाटचाल करतो. हा संस्कार झाल्यानंतर मुलाला वेद पठण, पूजा-अर्चा आणि धार्मिक नियमांचं पालन करायला शिकवलं जातं. जानवं धारण करणाऱ्या मुलाला काही खास नियम पाळावे लागतात, जसं की शुद्धता राखणे, रोज स्नान करणे, धार्मिक आचरण करणे इत्यादी.
मुलाला एक दिवसासाठी संन्यासी बनवणं म्हणजे त्याला जीवनातील मूल्यांशी जोडणं आणि त्याच्यात शिस्त व आत्मनियंत्रण आणण्याचा एक मार्ग मानला जातो. हा विधी मुलांना आयुष्यभर धार्मिक आणि नैतिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. ही अनोखी परंपरा येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचं काम करते.
हे ही वाचा : इथे बापच करतो मुलीशी लग्न, आई बनते सवत! 'या' जमातीत आजही जिवंत आहे विचित्र प्रथा, वाचा सविस्तर...
हे ही वाचा : मुलं चॅलेंज घेतात, नंतर लॅपटाॅप पेटवून देतात, शाळेत निघतोय जाळ अन् धूर, त्यामागचं कारणं ऐकून व्हाल चकित