देवघर : वर्षभरात जसे वेगवेगळे सण-सोहळे साजरे होतात, तसाच प्रेमाचा दिवसही उत्साहाने साजरा केला जातो. आता तो दिवस काही दूर नाही. दरवर्षीप्रमाणे येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होईल. या दिवशी अनेक कपल्स आयुष्यभर एकमेकांची साथ न सोडण्याच्या आणाभाका घेतात. अनेकजण आपलं प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. त्यातून काहीजणांना नकार मिळतो, तर काहीजणांना त्यांचं खरं प्रेम मिळतं. परंतु हे प्रेम कितपत टिकेल याची काही शाश्वती नसते, कारण जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
advertisement
जन्मोजन्मीच्या सोबतीसाठी केवळ प्रेम जडणं पुरेसं नसतं, तर मन आणि कुंडली जुळणंदेखील महत्त्वाचं आहे. शिवाय प्रेमात राशींची भूमिकासुद्धा विशेष असते. झारखंडच्या देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मानवी जीवन ग्रह, नक्षत्रांच्या स्थितीवर अवलंबून असतं.
Mangalsutra: मंगळसूत्रात काळे मणी का असतात? त्याशिवाय मंगळसूत्र अपूर्ण; जाणून घ्या नेमकं कारण
ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीचा प्रभाव पदोपदी मानवी जीवनावर होतो, मग ते करियर असलं किंवा प्रेमसंबंध असले तरी नशिबात जे लिहिलंय तेच घडतं. त्याचप्रमाणे काही राशी अशा आहेत, ज्यांना एकमेकांबाबत प्रचंड आकर्षण वाटत असलं, तरी त्या एकत्र कधीच सुखाने नांदू शकत नाहीत. त्या नेमक्या कोणत्या आहेत, पाहूया.
Shiv Mantra: ॐ नमः शिवाय..! का आहे हा शक्तिशाली शिवमंत्र? जप करण्याचे 7 चमत्कारी फायदे
'या' राशींची जोडी अडचणींची!
- मेष आणि कन्या
ज्योतिषी सांगतात की, तुमची रास मेष आणि तुमच्या जोडीदाराची रास कन्या असेल तर तुमच्यात वारंवार खटले उडतील. तुम्ही कधीच शांततेत जगू शकणार नाही. कारण तुमच्या राशी मिळून षडाष्टक योग निर्माण होतो. त्यामुळे तुमचा स्वभाव कितीही चांगला असला तरीही तुमच्यात नको नको त्या गोष्टींवरून वाद होतील. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी एकमेकांना अजिबात प्रपोज करू नये.
- तूळ आणि वृषभ
या दोन राशी मिळूनही षडाष्टक योग निर्माण होतो. त्यामुळे या राशीच्या कपल्समध्ये कायम भांडण होतं. त्यामुळे या दोघांपैकी एक जरी तुमची रास असेल तर व्हॅलेंटाईन डेला ज्यांना प्रपोज करणार आहात त्यांची रास आधी जाणून घ्या.
- मिथुन आणि वृश्चिक
आयुष्यात कितीही सुख असलं तरी या राशीच्या व्यक्तींचं एकमेकांशी कधीच पटू शकत नाही. ते कायम एकमेकांशी भांडणच करत राहणार. तुमच्या नात्याची सुरूवात कितीही अनोखी असेल, तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाला असाल, तरीही आयुष्यभर तुमच्यात भांडणंच होणार.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
