Mangalsutra: मंगळसूत्रात काळे मणी का असतात? त्याशिवाय मंगळसूत्र अपूर्ण; जाणून घ्या नेमकं कारण
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Mangalsutra: मंगळसूत्र हा सौभाग्यलंकार आहे. त्याला पतीचं रक्षाकवचही समजलं जातं. त्यामुळे स्त्रिया मंगळसूत्राला खूप जपतात. मंगळसूत्रात असलेले काळे मणी भगवान शंकरांचं प्रतीक मानले जातात.
मुंबई, 04 फेब्रुवारी : हिंदू धर्मात लग्नाच्या विधींमध्ये सप्तपदी, कन्यादान यांच्याप्रमाणेच मंगळसूत्रालाही खूप महत्त्व असतं. विशेष म्हणजे स्त्रियांसाठी हा केवळ सोन्याचा दागिना नसतो, तर त्यापेक्षाही जास्त महत्त्व त्याला असतं. सामान्यपणे मंगळसूत्रांमध्ये सोन्याचे मणी, काळे मणी आणि दोन सोन्याच्या वाट्या असाव्या लागतात. आपापल्या ऐपतीप्रमाणे त्याचं डिझाईन, नक्षीकाम व इतर गोष्टींमध्ये बदल होतो. एकवेळ सोन्याचे मणी नाही करता आले तरी चालू शकतात, पण मंगळसूत्रामध्ये काळे मणी असावेच लागतात. त्यामागचं कारण कधी जाणून घेतलंय का?
मंगळसूत्रांमध्ये हल्ली खूप कलाकुसर पाहायला मिळते. सोन्यामध्ये, चांदीमध्येदेखील मंगळसूत्र मिळतं, मात्र आजवर काळ्या मण्यांशिवाय मंगळसूत्र तयार झालेलं नाही. त्याचं कारण परंपरेनुसार मंगळसूत्रामध्ये काळे मणी घालणं गरजेचं असतं. हे मंगळसूत्र घातल्यावरच लग्न संपन्न होतं. वधूच्या 16 साजश्रृंगारांपैकी एक हे मंगळसूत्र असतं. वधूचं सौंदर्य खुलवणाऱ्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्राला वरचं स्थान असतं. विधीपूर्वक हे मंगळसूत्र परिधान केलं जातं. त्यानंतरच लग्नाचे विधी पूर्ण होतात.
advertisement
वर्षानुवर्षं मंगळसूत्र एकाच पद्धतीनं तयार केलं जात आहे. सोन्याचे मणी, काळे मणी आणि वाट्या असं त्याचं स्वरूप आहे. कालांतरानं वाट्यांच्या जागी पदकं किंवा पेंडंट आली, मात्र काळ्या मण्यांची जागा अजून बदलली नाही. काळ्या मण्यांशिवाय मंगळसूत्र अपूर्णच असतं. मंगळसूत्रात हे काळे मणी घालण्यामागे काही कारण असतं. असं म्हणतात, की विवाहित महिलांना आणि त्यांच्या संसाराला दृष्ट लागू नये म्हणून हे काळे मणी घातले जातात.
advertisement
मंगळसूत्र हा सौभाग्यलंकार आहे. त्याला पतीचं रक्षाकवचही समजलं जातं. त्यामुळे स्त्रिया मंगळसूत्राला खूप जपतात. मंगळसूत्रात असलेले काळे मणी भगवान शंकरांचं प्रतीक मानले जातात. तसंच मंगळसूत्रामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असंही मानलं जातं.
मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांच्या जोडीला सोन्याचे मणीही असतात. सोनं हा धातू आहे. त्याचे काही हीलिंग गुणधर्म असतात. विवाहित स्त्रियांना चिंता, काळजी आणि ताणमुक्त ठेवण्याकरता त्याची मदत होते. सोनं गुरूचा प्रभाव वाढवायला मदत करतं व त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होतं.
advertisement
भारतीय परंपरांमागे काही शास्त्रीय कारणंही निश्चितच आहेत. समाजाच्या धारणा, श्रद्धा यांच्या जोडीला ही कारणंही जाणून घेतली तर पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. मंगळसूत्रामध्ये सोन्याबरोबरच काळे मणी का असतात, याचंही उत्तर यातच दडलेलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2024 1:59 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mangalsutra: मंगळसूत्रात काळे मणी का असतात? त्याशिवाय मंगळसूत्र अपूर्ण; जाणून घ्या नेमकं कारण


