Shiv Mantra: ॐ नमः शिवाय..! का आहे हा शक्तिशाली शिवमंत्र? जप करण्याचे 7 चमत्कारी फायदे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shiv Mantra: "ॐ नमः शिवाय" हा मंत्र आत्म्याच्या शुद्धीसाठी आणि तणावापासून मुक्त होण्यासाठी एक सोपा मंत्र मानला जातो. धर्म शास्त्रात सांगितलेल्या मंत्रांचा जप केल्यानं एक प्रकारची कंपन निर्माण होते, ज्यामुळे जीवनाला सकारात्मकता प्राप्त होते.
मुंबई, 04 फेब्रुवारी : भगवान शिवशंकर हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक मानले जातात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा जप केला जातो. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार सर्व मंत्रांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. मंत्र पठण केल्यानं अनेक फायदेही होतात. आजच्या व्यग्र जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीला योग आणि अध्यात्माचा आधार घेऊन आपल्या जीवनातील तणाव आणि चिंता दूर करायची असते. "ॐ नमः शिवाय" हा मंत्र आत्म्याच्या शुद्धीसाठी आणि तणावापासून मुक्त होण्यासाठी एक सोपा मंत्र मानला जातो. धर्म शास्त्रात सांगितलेल्या मंत्रांचा जप केल्यानं एक प्रकारची कंपन निर्माण होते, ज्यामुळे जीवनाला सकारात्मकता प्राप्त होते. ज्योतिषी आलोक पंड्या यांच्याकडून शिवाच्या "ओम नमः शिवाय" या मंत्राचा प्रभावशाली प्रभाव आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.
ॐ नमः शिवाय मंत्राचे महत्त्व -
भगवान भोलेनाथांना समर्पित या मंत्राला पंचाक्षर मंत्र असेही म्हणतात. या मंत्रामध्ये पाच तत्वांचा संयोग असल्याचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. मान्यतेनुसार, या मंत्राच्या पहिल्या अक्षरापासून सूर्याची निर्मिती झाली आहे. “ओम” हे अक्षर सूर्याला देखील प्रिय आहे, म्हणून जेव्हा आपण “ओम” म्हणतो तेव्हा महादेवासोबत सूर्यदेवाचीही पूजा केली जाते. "नमः शिवाय" चा अर्थ भगवान शिवाच्या चरणी स्वतःला समर्पित करणे आहे, म्हणून हिंदू धर्मात या मंत्राचा दररोज जप केला जातो.
advertisement
ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करण्याचे फायदे -
1- हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, "ओम नमः शिवाय" मंत्राचा जप केल्यानं व्यक्तीमध्ये तेज निर्माण होते.
2- जो व्यक्ती या मंत्राचा रोज जप करतो. अशा लोकांचे वर्तन आणि व्यक्तिमत्व आकर्षक बनते.
3- अशा व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक संकटे आपोआप दूर होतात.
advertisement
4- “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप केल्याने महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
5- या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीमधील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात आनंद येतो.
6- “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप केल्यानं मनुष्याला भगवान भोलेनाथासोबत सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते.
7- सूर्यदेवाला नऊ ग्रहांचा राजा मानलं जातं, कुंडलीत सूर्य देव शांत असल्यास इतर सर्व ग्रहही शांत होतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2024 7:31 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shiv Mantra: ॐ नमः शिवाय..! का आहे हा शक्तिशाली शिवमंत्र? जप करण्याचे 7 चमत्कारी फायदे


