वास्तू तज्ज्ञांच्या मते, बाथरूममध्ये आरसा लावला जाऊ शकतो, पण तो विचार न करता लावू नये. चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या आकाराचा आरसा घराच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम करू शकतो. याउलट, योग्य दिशेला लावलेला आरसा ऊर्जेचा प्रवाह संतुलित ठेवतो आणि सकारात्मकता वाढवतो.
बाथरूममध्ये आरसा दरवाजाच्या समोर कधीही लावू नये. दरवाजा उघडताच समोर आरसा असल्यास ऊर्जा असंतुलित होते, ज्यामुळे घरात तणाव, वाद किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो.
advertisement
आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावण्याचा प्रयत्न करावा. या दोन दिशा ऊर्जेचा प्रवाह संतुलित ठेवतात आणि सकारात्मक लहरी वाढवतात. जागा कमी असेल तर दरवाजापासून थोड्या अंतरावर आरसा लावावा, जेणेकरून प्रवेश करतानाच त्यावर थेट नजर पडणार नाही.
सूर्याच्या प्रभावाने जबरदस्त तेज! नवीन 2026 वर्षात तीन मूलांकांची होणार चांदी
वास्तूमध्ये आयताकृती किंवा चौरस आरसा उत्तम मानला जातो. हे आकार स्थिरता दर्शवतात, ज्यामुळे घरातील ऊर्जा देखील स्थिर राहते. गोल, विचित्र डिझाइन किंवा विचित्र कटिंग असलेले आरसे लावणे टाळावे. असे आरसे ऊर्जेचा प्रवाह विचलित करू शकतात. आरसा असा असावा की त्यामध्ये तुमचे पूर्ण प्रतिबिंब स्पष्ट दिसेल. अर्धवट किंवा अस्पष्ट प्रतिबिंबामुळे मानसिक गोंधळ किंवा अस्वस्थता वाढू शकते. बाथरूममधील आरसा नेहमी स्वच्छ आणि डागविरहित असावा. पुसट, ओरखडे असलेला किंवा घाणेरडा आरसा नकारात्मक ऊर्जा वाढवतो. तुटलेला किंवा तडा गेलेला आरसा कोणत्याही परिस्थितीत वापरू नये. यामुळे घरात अस्वस्थता, गोंधळ आणि नकारात्मकता वाढते. तो त्वरित बदलणे आवश्यक आहे.
जर बाथरूम खूप लहान असेल आणि दरवाजा उघडताच समोर भिंत येत असेल, तर तिथे आरसा लावणे टाळावे. ज्या ठिकाणी सतत पाण्याचे थेंब उडतात तिथे आरसा लावू नका, कारण त्यामुळे त्यावर लवकर डाग पडतात. घरात आधीच काही समस्या सुरू असतील, तर तज्ञांच्या सल्ल्याशिवाय आरशाची जागा बदलू नका, कारण चुकीच्या बदलामुळे तणाव वाढू शकतो. प्रत्येक घराचा नकाशा, दिशा आणि रचना वेगळी असते. त्यामुळे मनात काही शंका असल्यास अनुभवी वास्तू तज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. चुकीच्या समजुतीतून केलेले बदल फायद्याऐवजी नुकसान करू शकतात.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जानेवारी महिना कोणासाठी लकी?
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
