TRENDING:

चुकूनही घरात लावू नका ‘ही’ झाडं, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Last Updated:

ही झाडं घरात लावणं अशुभ ठरतं, ती दारिद्र्य आणतात. चला तर, ही झाडं कोणती ते जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात अनेकजण घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी, घरात समृद्धता प्रसन्नता राहण्यासाठी घरामध्ये झाडं लावतात, बाग तयार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घराभोवती लावणं हे तुमच्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. कारण ही झाडं तुमच्या जीवनावर वाईट परिणाम करू शकतात.
ही झाडं लावू नका
ही झाडं लावू नका
advertisement

वास्तुशास्त्रात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेला विशेष महत्त्व आहे. यानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. वास्तूमध्ये झाडं आणि वनस्पतींसह प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा देण्यात आली आहे. वास्तुचे हे नियम पाळले नाहीत, तर घरातील सदस्यांना त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं चुकूनही घरात लावू नयेत. ही झाडं घरात लावणं अशुभ ठरतं, ती दारिद्र्य आणतात. चला तर, ही झाडं कोणती ते जाणून घेऊ.

advertisement

बाभूळ

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बाभळीचं झाड लावल्याने वाद वाढतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य मानसिकदृष्ट्या आजारी पडू लागतात. बाभळीचं झाड हे घराभोवती असणंदेखील अशुभ मानलं जातं.

काटेरी झाडे

वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाडं कधीही लावू नयेत. त्यामुळे घरात तणावाचं वातावरण राहतं. अशी झाडं परस्पर मतभेद वाढवण्याचंही काम करतात. अनेक वेळा लोक नकळत ही झाडं लावतात, पण त्यामुळे कुटुंबाला मोठा फटका बसू शकतो.

advertisement

बोन्साय

आजच्या काळात घराच्या सजावटीसाठी बोन्साय रोपं ठेवण्याचा ट्रेंड वाढला आहे. ही झाडं दिसायला नक्कीच सुंदर आहेत, पण ती घरात ठेवल्याने त्याचे नकारात्मक परिणाम होतात. यामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

मेहंदी

मेहंदीच्या रोपामध्ये वाईट शक्तींचा वास असतो, असं मानलं जातं. हे रोप घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. घरातील सुख-शांती भंग होते.

advertisement

खजुराचे झाड

घराच्या अंगणात खजुराचं झाड चुकूनही लावू नये. हे अशुभ मानलं जातं. हे झाड दिसायला खूप सुंदर आहे, पण असं मानलं जातं की ते लावल्यानं कुटुंबातील सदस्यांचे कर्ज वाढतं.

चिंच

वास्तुशास्त्रानुसार चिंचेचं झाड घरात लावू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते. हे झाड लावल्याने घरात नेहमी भीतीचं वातावरण असतं.

पिंपळ

advertisement

पिंपळाचं झाड घरात लावू नये. हे झाड लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. भिंतीवर किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पिंपळाचं रोप उगवलं असेल तर ते काढून टाकावं.

सुकलेली झाडं काढून टाका

घरात लावलेलं एखादं झाड किंवा रोप सुकलं असेल, तर ते काढून टाकणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार सुकलेली झाडं घरात दुःख आणतात, व अशा झाडांमुळे घरात नकारात्मकता वाढते.

दरम्यान, वास्तुशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/
चुकूनही घरात लावू नका ‘ही’ झाडं, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल