आजच्या धावपळीच्या युगात आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण तुम्हाला माहीत आहे का, की प्रेमानंद जी महाराज आणि भारतीय वास्तुशास्त्र या साध्या दिसणाऱ्या झाडूला लक्ष्मीचे रूप का मानतात? आजच्या लेखात आपण याच झाडूशी संबंधित अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या घराची ऊर्जा आणि समृद्धी बदलू शकतात.
झाडू: केवळ स्वच्छतेचं साधन की ऊर्जेचा स्रोत?
advertisement
भारतीय परंपरेत झाडूला केवळ कचरा काढण्याचं साधन मानलं जात नाही. गावांपासून शहरांपर्यंत आजही झाडूशी संबंधित श्रद्धा सारख्याच आहेत. आधुनिक जीवनशैलीत आपण कदाचित व्हॅक्युम क्लीनर वापरू लागलो असू, पण केरसुणी किंवा 'झाडू'चे महत्त्व कमी झालेले नाही. जुन्या काळात मानले जायचे की, घर स्वच्छ असेल तरच तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
झाडू ठेवण्याची योग्य जागा कोणती?
अनेकांना सवय असते की काम झालं की झाडू दरवाजाच्या मागे किंवा किचनच्या कोपऱ्यात कुठेही ठेवून देतात. पण वास्तूशास्त्रानुसार हे चुकीचे ठरू शकते.
घराच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपऱ्यात झाडू ठेवल्याने नकारात्मकता वाढते, असे मानले जाते. तर झाडू ठेवण्यासाठी घराची दक्षिण-पश्चिम दिशा सर्वात योग्य मानली जाते. ज्याप्रमाणे आपण आपले पैसे किंवा दागिने कपाटात लपवून ठेवतो, तसेच झाडू सुद्धा इतरांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा, असे प्रेमानंद जी महाराज सांगतात.
झाडू मारण्याची योग्य वेळ कोणती?
"केव्हाही वेळ मिळाला की झाडू मारला" कधीही सकाळी उठलं की झाडू मारणे असं करून चालत नाही. शास्त्रानुसार, सूर्योदयानंतर लगेच झाडू मारणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते. त्यामुळे केव्हा ही उठून झाडू मारण्याला अर्थ नाही तर सुर्यदयापूर्वी झाडू मारण्याला महत्व आहे. मात्र, सूर्यास्तानंतर किंवा रात्री झाडू मारणे टाळावे. जर काही कारणास्तव रात्री झाडू मारावा लागलाच, तर तो कचरा रात्रीच घराबाहेर फेकू नका, तो एका कोपऱ्यात गोळा करून ठेवा आणि सकाळी बाहेर टाका.
तुटलेली झाडू घरात का ठेवू नये?
अनेकदा आपण झाडू पूर्ण झिजेपर्यंत किंवा तुटेपर्यंत वापरतो. पण वास्तू आणि विज्ञान दोन्ही सांगतात की तुटलेली झाडू वापरणे नुकसानकारक आहे. तुटलेली झाडू घरात दारिद्र्य आणते असे मानले जाते.
तुटलेल्या झाडूने स्वच्छता नीट होत नाही, उलट धुळीचे कण हवेत उडतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे झाडू खराब होताच ती बदलणे हाच व्यावहारिक निर्णय ठरतो.
झाडू वापरताना टाळाव्यात अशा 'या' 4 चुका
- झाडू कधीही उभी करून ठेवू नका, ती नेहमी आडवी ठेवावी.
- झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे चुकून पाय लागल्यास नमस्कार करावा.
- झाडू नेहमी झाकून किंवा लपवून ठेवावी.
- झाडू मारल्यानंतर कचरा घरात जास्त वेळ साठवून ठेवू नका, यामुळे बॅक्टेरिया आणि नकारात्मकता दोन्ही वाढतात.
परंपरा आणि विज्ञानाचा मेळ
आजची पिढी प्रत्येक गोष्टीमागे तर्क शोधते. झाडूशी संबंधित सर्वच गोष्टी विज्ञानाशी जोडता येणार नाहीत, पण त्यामागे एक शिस्त आणि स्वच्छतेचा विचार नक्कीच आहे. घर नीटनेटके ठेवल्याने मानसिक शांतता मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. प्रेमानंद जी महाराजांच्या मते, आपल्या सवयीच आपले नशीब घडवतात, आणि स्वच्छतेची सवय ही त्यातली सर्वात पहिली पायरी आहे.
झाडूशी संबंधित श्रद्धा तुम्ही मानत असाल किंवा नसाल, पण एक गोष्ट नक्की की 'स्वच्छता तिथेच समृद्धी'. घर व्यवस्थित ठेवल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते, ज्याचा थेट परिणाम आपल्या कामावर आणि प्रगतीवर होतो.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
