अनेकांकडून नवीन वर्ष 2025 साठी आणलेले कॅलेंडर कोणत्याही भिंतीवर अथवा ठिकाणी ठेवण्यात येते. परंतु वास्तू शास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावण्याची देखील एक योग्य जागा असते. जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते. तेव्हा नवीन वर्षाचं कॅलेंडर कोणत्या ठिकाणी ठेवावं या विषयी माहिती जाणून घेऊयात.
advertisement
काहीजण नवीन वर्ष देखील घरात जुन्या वर्षाचे कॅलेंडर लावून ठेवतात. परंतु असे करणे चुकीचे असल्याचे काही ज्योतिषाचार्यांनुसार सांगितले जाते.
वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही, असे सांगितले जाते. यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टीं घडण्याची शक्यता कमी होते. तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये आणि वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे, असा सल्ला दिला जातो.
यंदा गौरी आवाहन कधी, शुभ मुहूर्त, पूजा कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
कुठे लावावे नवीन वर्षाचे कॅलेंडर?
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. वास्तुनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने प्रगती होते. पूर्व दिशा ही सूर्याची उगवण्याची दिशा आहे. त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
नशिबाचा खेळ! या जन्मतारखा असणाऱ्यांची लव्ह मॅरेज होतात; जास्त विरोध नाही होत
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)