Rudraksha: 7 मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे जबरदस्त फायदे अनुभवाला फक्त 7 दिवसात
तणाव दूर राहतो
असे म्हणतात की ज्यांच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असते त्यांनी पांढर्या कपड्यात धणे बांधून पूर्व दिशेला ठेवावे, त्यामुळे घरातील तणाव दूर राहतो.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपयुक्त
जर तुमच्या घरात शांतता नसेल आणि घरात नेहमीच आर्थिक संकट असेल तर बुधवारी हिरवी धणे गायीला खाऊ घालावे. असे मानले जाते की, असे केल्याने घरात आर्थिक संकट येत नाही आणि तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते.
advertisement
कागदावर धणे
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे असतील आणि तो तुम्हाला ते परत करत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे नाव एका पांढऱ्या कागदावर लिहावे, त्यावर कोरडे धणे ठेवावेत आणि ते पाण्यात वाहू द्यावे. हा उपाय शुक्रवारी करावा. लवकरच तुमचे अडकलेले पैसे मिळतील.
विविध समस्यांपासून मुक्तीसाठी
जर तुम्हाला दररोज एक ना कोणत्या समस्यांनी घेरले असेल आणि तुमचा दिवस अडचणीत जात असेल तर अशा स्थितीत लाल कपड्यात कोरडी धणे ठेवा आणि हनुमानजींना अर्पण करा. तसेच हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने समस्यांपासून मुक्ती मिळते.
Radha Ashtami 2024: राधाअष्टमी व्रत केल्याने होतील चमत्कारिक फायदे! श्रीकृष्णही होतात प्रसन्न
पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती
प्रत्येकजण पैशाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असतो, अशा स्थितीत मातीच्या भांड्यात कोरडे धणे ठेवा आणि कोणत्याही महिन्याच्या पूर्वार्धात त्यामध्ये नाणी ठेवा आणि उत्तर दिशेला स्थापित करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)