शुक्र ग्रहाला धन, वैभव आणि संपत्तीचा जनक मानलं जातं. या ग्रहाचा ज्या राशींवर प्रभाव असतो त्या राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित धनलाभ होतो आणि हळूहळू त्यांचं आयुष्यही वैभवशाली होतं. आता शुक्र ग्रह सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. उद्या, 3 नोव्हेंबर रोजी हा प्रवेश होईल आणि 29 नोव्हेंबरपर्यंत शुक्र कन्येतच राहील. त्यानंतर तो तूळ राशीत जाईल.
advertisement
कन्या राशीत केतू आधीपासूनच विराजमान आहे. त्यात आता शुक्रदेखील या राशीत प्रवेश करणार असल्याने अर्थातच याचा परिणाम सर्व राशीच्या व्यक्तींवर होईल आणि काही राशीच्या व्यक्तींसाठी या मिलनाचा प्रभाव सकारात्मक ठरेल. या राशी कोणत्या पाहूया.
कर्क : शुक्र आणि केतू मिलनाचा आपल्यावर शुभ प्रभाव पडेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीतून आपल्याला फायदाचा होईल. मात्र त्यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंतचा काळ सकारात्मक असेल. आपला व्यापारही विस्तारेल. आपली प्रकृती ठीक नसली, तर त्यात सुधारणा होईल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. शिवाय आपल्या सुख-सुविधांमध्येसुद्धा वाढ होईल.
कन्या : शुक्र आणि केतू दोन्ही ग्रह कन्या राशीतच विराजमान होणार असल्याने आपल्याला याचा प्रचंड फायदा होईल. आपण जे काही कार्य हाती घ्याल, त्यात आपल्याला यश मिळेल. शिवाय नोकरीत हवी तशी बढती मिळू शकते. व्यापार सुरू करण्यासाठी हा काळ अगदी योग्य आहे. इतरांकडून तुमचे थकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल, शिवाय जोडीदारासह धार्मिकस्थळी प्रवासही होईल.
वृश्चिक : 29 नोव्हेंबरपर्यंत आपलं नशीब उजळेल. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्यामुळे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी परिस्थिती असेल. परिणामी मन प्रसन्न राहील. व्यापारात लाभ होईल. दाम्पत्य जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. कामानिमित्त दूरचा प्रवास होईल, जो लाभदायी ठरेल. आरोग्यही उत्तम साथ देईल, वैवाहिक जीवनात सुखद घटना घडतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g