विजयादशमीला विविध विधी
विजयादशमीच्या दिवशी हिंदू धर्मात विविध प्रकारचे विधी केले जातात. या दिवशी भगवान राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि दुर्गामातेची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते याला 'शस्त्र पूजन' म्हणतात.
शुभ कार्य सुरू करण्याची वेळ
विजयादशमी या सणाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तही मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, नवीन कार्य सुरू करणं किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं चांगलं मानलं जातं.
advertisement
विजयादशमीची तिथी
विजयादशमीची तारीख दरवर्षी बदलते. 2023 मध्ये, विजयादशमीची तिथी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 पर्यंत असेल. यंदा विजयादशमी 24 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. या दिवशी दोन शुभ योगही तयार होत आहेत.
विजयादशमीला शुभ योग
24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:27 ते दुपारी 3:38 आणि 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:38 ते 6:28 या वेळेत रवी योग असेल. या शिवाय दसरा वृद्धी योग 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.40 वाजल्यापासून संपूर्ण रात्रीपर्यंत राहील.
रवी योग
रवी योग ज्योतिषशास्त्रातील एक विशेष संयोग दर्शवतो, ज्यामध्ये सूर्य आणि चंद्र यांचं एकत्र संयोजन होतं. जेव्हा चंद्र एका विशिष्ट राशीत असतो आणि सूर्य दुसर्या विशिष्ट राशीत असतो तेव्हा रवी योग बनतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या दिवशी रवी योग तयार होतो, त्या दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम यशस्वी होतं. विशेषत: लग्न, गृहप्रवेश, नोकरी, प्रवास इत्यादी शुभकार्यांसाठी हा योग निवडतात. त्यामुळे हिंदी ज्योतिषशास्त्रात रवियोगाचं महत्त्व खूप जास्त आहे, या संदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने वृत्त दिलंय.
दसरा वृद्धी योगया अधिक महिन्यात दसरा येतो तेव्हा त्याला 'दसरा वृद्धी योग' म्हणतात. भारतीय ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धांमध्ये याला खूप महत्त्व आहे. या वेळी केलेल्या पूजा आणि इतर कार्यक्रमांचे परिणाम दुप्पट होतात, अशी त्यामागची धारणा आहे. म्हणून, या वृद्धी योगाचा विशेष लाभ घेण्यासाठी लोक अधिक सावधगिरीने आणि भक्तिभावाने पूजा करतात.