उद्या मंगळवार 10 सप्टेंबर रोजी गौरी घरी येणार आहेत. घरी गौरी आवाहन रात्री 08.02 वाजण्यापूर्वी करून घ्यावे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन झाल्यावर. दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे त्यांना जेष्ठागौरी असं म्हणतात. प्रत्येक भागाप्रमाणे गौरी पूजनाची पद्धत, कुळाचार वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. सोबत घरगुती गणपतींचही विसर्जन होतं.
advertisement
गौरी आणि गणपतीचं नातं काय? काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात.
गणपतीचे दर्शन घेताना तुम्हीही करता का ही चूक? 90% लोकांना माहित नसेल योग्य पद्धत
महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं. त्यांना तुळशी वृंदावना जवळून घरात आणतात. तेव्हा लक्ष्मी प्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात. त्यानंतर त्यांना स्थानापन्न केलं जातं. गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्या दिवशी महाप्रसाद केला जातो.
या दिवशी 16 भाज्या, खीर, गोडाचे पदार्थ केले जातात. तर, याच दिवशी काही ठिकाणी ववसा घेण्याची पद्धत असते. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळं यांचाही गौरी-गणपतीला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन किती दिवसांनी करावे? ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)