गणपती बाप्पाचे दर्शन घेताना तुम्हीही करता का ही चूक? 90% लोकांना माहित नसेल दर्शनाची योग्य पद्धत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
महाराष्ट्रातील घराघरात तसेच वेगवेगळ्या मंडळांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. अनेक लोक बाप्पाचे दर्शन तर करतात, मात्र त्याचे दर्शन घेताना ते एक चूक करतात.
हिंदू धर्मात गणेश चतुर्थी अतिशय महत्त्वाचा सण मानला गेला आहे. 10 अगदी वाजतगाजत गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या शुभ क्षणी प्रत्येकजण बाप्पाची मनोभावे सेवा आणि पूजा करतात. बाप्पाचे आदरातिथ्य करण्यात कोणतीही कमी ठेवत नाहीत. मात्र बाप्पाची पूजा करताना अनेकजण हमखास काही चुका करतात.
काय आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाची योग्य पद्धत?
महाराष्ट्रातील घराघरात तसेच वेगवेगळ्या मंडळांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. अनेक लोक बाप्पाचे दर्शन तर करतात, मात्र त्याचे दर्शन घेताना ते एक चूक करतात. बाप्पाच्या दर्शनाबरोबरच प्रदक्षिणा घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
प्राचीन सनातन धर्मात प्रदक्षिणा घालणे महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. जेव्हा तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला जाता तेव्हा त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालायला विसरू नका. आता बाप्पाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचेही उत्तर शास्त्रात देण्यात आले आहे.
गणपती बाप्पाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात?
"बह्वच परिशिष्ट" यातील 'एकां विनायके कुर्यात्' या वचनानुसार भगवान विनायकाभोवती एक प्रदक्षिणा घलावी. "ग्रन्थान्तर" यातील 'तिस्त्रः कार्या विनायके ॥' या वचनानुसार भगवान विनायकाभोवती तीन प्रदक्षिणा घालणेही चांगले आहे. 'नारदपुराण' (पूर्वार्ध अध्याय क्रमांक 13) मध्येही तीन प्रदक्षिणा घालण्याबाबत सांगण्यात आले आहे. यात म्हटले आहे, 'तिस्रो विनायकस्यापि' म्हणजेच भगवान विनायकाभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
advertisement
यावरून असे लक्षात येते की, गणपती बाप्पाभोवती तीन प्रदक्षिणा घालण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. जर तुमच्याकडे वेळेचा अभाव आहे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तुम्ही तीन प्रदक्षिणा घालू शकत नसाल तर एक प्रदक्षिणा घातली जाऊ शकते.
यंदा 7 सप्टेंबर गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले असून 17 सप्टेंबरला गणेश विसर्जन असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 08, 2024 3:24 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
गणपती बाप्पाचे दर्शन घेताना तुम्हीही करता का ही चूक? 90% लोकांना माहित नसेल दर्शनाची योग्य पद्धत








