TRENDING:

Hartalika Teej 2025: महिलांसाठी 'हा' दिवस खास! देवी पार्वतीची करा विशेष पूजा; वैवाहिक जीवन होईल सुखी

Last Updated:

या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्य व सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी या दिवशी उपवास व पूजा..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Hartalika Teej 2025: श्रावण महिना सुरू होताच, देशभरात शिवभक्तीचे वातावरण तयार होते. सनातन धर्मात श्रावणाला खूप पवित्र आणि खास मानले जाते. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे विशेष महत्त्वाचे असते. श्रावण महिन्याच्या या शुभ काळात महिलांसाठी एक खास सण येतो, तो म्हणजे हरियाली तीज किंवा हरतालिका तीज. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात, तर अविवाहित मुलींना मनासारखा जीवनसाथी मिळावा या इच्छेसाठी हरतालिका तीजचे व्रत करतात.
Hartalika Teej 2025
Hartalika Teej 2025
advertisement

हरतालिका तीजची तारीख आणि शुभ मुहूर्त

अयोध्या येथील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांच्या माहितीनुसार, हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 26 जुलै 2025 रोजी रात्री 10:41 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 जुलै रोजी रात्री 10:42 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे हरियाली तीजचा उपवास 26 जुलै रोजी केला जाईल.

हरतालिका तीजच्या दिवशी पूजा आणि उपवासासाठी शुभ वेळेला विशेष महत्त्व असते. जर तुम्हाला या दिवशी व्यवस्थित पूजा करायची असेल, तर या शुभ मुहूर्तावर नक्की पूजा करा. पूजेचा ब्रह्म मुहूर्त सकाळी 4:16 ते 4:58 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 12:57 पर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी 2:43 ते 3:30 पर्यंत असेल. असे मानले जाते की या शुभ मुहूर्तावर पूजा आणि उपवास केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

advertisement

हरतालिका तीजची पूजा पद्धत आणि उपाय

हरतालिका तीजच्या दिवशी महिला माता पार्वती आणि भगवान शिव यांची योग्य विधीपूर्वक पूजा करतात. विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख, शांती आणि प्रेमळ संबंधांसाठी हे व्रत करतात.

जर तुम्हालाही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणायचा असेल, तर हरियाली तीजच्या दिवशी काही खास उपाय नक्की करा. या दिवशी माता पार्वतीला पूर्ण श्रद्धेने 16 शृंगार अर्पण करा. भगवान शिवाचा जलाभिषेक करा आणि शिव-पार्वतीच्या मंत्रांचा जप करा. याशिवाय, माता पार्वतीला बांगड्या, कुंकू, टिकली इत्यादी सौभाग्य वस्तू अर्पण करा. असे मानले जाते की, हे उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि प्रेम, समृद्धी, आनंद आणि शांती टिकून राहते.

advertisement

विवाहात अडथळा येत असल्यास काय करावे?

हरतालिका तीज त्या मुलींसाठी देखील खूप शुभ मानली जाते ज्यांच्या विवाहात काही अडथळे येत आहेत. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची खऱ्या मनाने पूजा करा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि शिव मंत्राचा जप करा. असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि इच्छित जीवनसाथी मिळण्याची शक्यता निर्माण होते.

advertisement

हे ही वाचा : श्रावणात गुपचूप घरी आणा 'या' 4 वस्तू, पैशाची चणचण होईल दूर अन् घरात नांदेल सुख-समृद्धी

हे ही वाचा : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यामध्ये फरक काय? भारतात कुठे आहेत 12 तिर्थस्थान?

मराठी बातम्या/अध्यात्म/
Hartalika Teej 2025: महिलांसाठी 'हा' दिवस खास! देवी पार्वतीची करा विशेष पूजा; वैवाहिक जीवन होईल सुखी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल