वास्तूचा थेट परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्यांवर होत असतो. हीच गोष्ट ऑफिस, व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणीदेखील लागू होते. या जागी चांगलं वातावरण, सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी सकाळी थोडा वेळ शंखनाद करावा. यामुळे या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक ऊर्जा आत येते. तुमच्या घरात गंगाजल असेल तर ते ईशान्य कोपऱ्यातल्या देवघरात ठेवावं. हे जल प्लास्टिकच्या बाटलीत कदापि ठेवू नये. यासाठी काचेच्या बाटलीचा किंवा भांड्याचा वापर करावा. पूजा झाल्यावर घराच्या प्रवेशद्वारापासून ते किचनपर्यंत सर्व ठिकाणी गंगाजल शिंपडावं. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
advertisement
आर्थिक बाबींमध्ये नशीब खेचून आणण्याचा काळ; या 5 राशींसाठी ग्रहस्थिती शुभ
प्रत्येक घरात आरसा असतो. बऱ्याचदा या आरशावर धूळ साचते; पण ती लवकर लक्षात येत नाही. आरशावर धूळ साचण्याचा अर्थ समृद्धीवर धूळ साचणं होय. त्यामुळे घरातले आरसे रोज स्वच्छ करावेत. त्यामुळे घरात समृद्धी येते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात आरसा लावला तर धनहानी होऊ शकते. त्यामुळे आरसा उत्तर आणि पूर्व दिशेच्या कोपऱ्यात म्हणजेच ईशान्येला लावावा. चिकटवता येणारा किंवा तुटलेला आरसा घरात ठेवू नये. आरसा फुटणं, तुटणं हे धनहानीचे संकेत असतात. त्यामुळे घरात आरसा लावताना पुरेशी दक्षता घ्यावी.
घरात क्रॉस व्हेंटिलेशनसाठी छोट्या खिडक्या किंवा स्कायलाइट्स असतात. त्या नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. या खिडक्या किंवा स्कायलाइट्सवर धूळ साचल्यास घरात समृद्धी येत नाही. कोळ्याचं जाळं हे दारिद्र्याचं लक्षण असतं. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी खिडक्या किंवा स्कायलाइट्स नियमित स्वच्छ कराव्यात, असं वास्तुशास्त्राचे जाणकार सांगतात.
अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला म्हणून करतात या गोष्टी
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)