Money Mantra: आर्थिक बाबींमध्ये नशीब खेचून आणण्याचा काळ; या 5 राशींसाठी ग्रहस्थिती शुभ
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं गुरुवारचे (18 एप्रिल 2024) राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष (Aries) : आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटेल; मात्र जसजसा वेळ पुढे जाईल तसतशी कामं व्हायला सुरुवात होईल. रखडलेले पैसे मिळतील. ते पैसे घरखर्चासाठी वापरू नका. योग्य सल्ला घेऊन त्यांची गुंतवणूक करा. भविष्यात तुम्हाला मोठे लाभ मिळतील.उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला.
advertisement
advertisement
मिथुन (Gemini) : शारीरिक समस्येमुळे ऑफिसमधल्या कामावर दुष्परिणाम होऊ शकेल. त्यामुळे ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून तुमची प्रतिमा उतरेल. तरीही आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका.उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.
advertisement
कर्क (Cancer) : नशिबाने संधी मिळतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. तुमच्याशी संबंधित काही गोष्टींमुळे वाद वाढू शकतील. पैसे खर्च करण्यापूर्वी विचार करा. अन्यथा भविष्यात पश्चात्तापाची वेळ येईल. बचतीचा प्रयत्न करा.उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा.
advertisement
सिंह (Leo) : बिझनेसविषयक गोष्टींमध्ये निर्णय घेताना तुम्हाला स्पष्ट आणि स्वच्छ मनाने काम करावं लागेल. अनेक समस्या तुम्ही सहज आणि वेगाने सोडवाल. उत्तुंग स्थानी पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. वायफळ गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. तसं केलंत, तर पैसे गमावून बसाल आणि संधीही घालवून बसाल.उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा.
advertisement
कन्या (Virgo) : आर्थिक बाबींमध्ये नशीब खेचून आणण्याचा आजचा दिवस आहे. प्रस्थापित व्यवसायाचा विस्तार होईल. रिसोर्सेस उभे करून तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत केली पाहिजे. कामाच्या ठिकाणी चोरीची शक्यता आहे. ऑनलाइन फसवणुकीला तुम्ही बळी पडण्याची शक्यता आहे.उपाय : श्री भैरव मंदिरात नारळ अर्पण करा.
advertisement
advertisement
advertisement
धनू (Sagittarius) : छोट्या उद्योजकांसाठी दिवस उत्तम आहे. त्यांना चांगली डील्स मिळतील. नोकरदार व्यक्तींना मात्र दिवस चांगला नाही. आर्थिक तोट्याची शक्यता असल्याने सावध राहा. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राखा. कोणालाही पैसे कर्जाऊ देताना विचार करा.उपाय : 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करावा.
advertisement
advertisement
advertisement