Video : महागडी साडी, तरी सचिनच्या बायकोलाही पडला टिपिकल बायकांसारखा प्रश्न; म्हणाली, 'साडीचा...'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जेव्हा अंजली तेंडूलकरही महागडी साडी विकत घेताना विचारते टिपिकल बायकांसारखा प्रश्न, हा Video एकदा पाहाच
मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच भरभरून व्हिडीओ शेअर केले जातात. यांपैकी काही व्हिडीओ हे माहिती देणारे असतात तर काही व्हिडीओ हे आपल्याला विचारात पाडणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित आहे.
आता कोणीही सेलिब्रिटी म्हटलं किंवा त्याची बायको म्हटलं की आपल्या डोक्यात त्या व्यक्तीची एकदम सुप्रीम इमेज किंवा व्यक्तिमत्त्व तयार होतं. ज्यामुळे आपण विचार करतो की नक्कीच ही व्यक्ती आपल्यासारखी नसेल. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही गोष्ट विकत घेताना एकदाही विचार करावा लागत नसेल. थेट वस्तू आवडली आणि ती विकत घेतली म्हणजे झालं. त्यातल्या त्यात ती वस्तू खराब निघाली तरी कुठे बिघडलं? आपण नवीन घेऊ, असा विचार ती व्यक्ती करत असेल असं आपलं आपणच गृहीत धरतो. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ मात्र काहीतरी वेगळंच दृश्य दाखवत आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
advertisement
या व्हिडीओत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत महेश्वरी साडी विणकरांच्या गावी पोहोचतो. तो आधी एका वयस्कर काकूंना नमस्कार करतो आणि त्यांच्याशी संभाषण करताना दिसतो. खरंतर सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत महेश्वरी साडी विणकरांच्या ठिकाणी गेला आहे. जिथे काही लोकल लोक मिळून महेश्वरी साडी बनवताना, धाग्याला रंग देताना दिसत आहेत.
advertisement
पारंपारिक पद्धतीने येथील कारागीर लोक पाण्यात रंग आणि लिक्विड टाकून धाग्यांना रंग चढवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी पातेल्यात सगळं गरम करण्यासाठी ठेवलं आहे. पुढे एक व्यक्ती रंगाचं कॅटलॉग काढतो आणि लोकांना धाग्याचा रंग त्या कॅटलॉगमधील रंगाला मॅचिंग करून दाखवतो. तेव्हा सचिनची बायको अंजली त्यांना गुलाबी रंगाबद्दल विचारते तेव्हा ते गुलाबी रंग आणून देखील दाखवतात. पण या सगळ्या अंजली तेंडुलकर यांना टिपिकल महिलांसारखा प्रश्न पडतो आणि ते थेट त्या कारागिरांना विचारूनच टाकतात की, "या साडीचा रंग तर नाही जाणार ना...?" पुढे दुकानदार त्यांना नाही असं उत्तर देतो.
advertisement
एकंदरीत काय तर कितीही श्रीमंत असलं, कितीही ग्लॅमरमध्ये राहिलं तरी बायकांच्या मनातले प्रश्न हे सारखेच असतात. "रंग टिकेल का? कपडा खराब तर होणार नाही ना?" या शंका त्यांना स्वाभाविकपणे पडतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 4:56 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : महागडी साडी, तरी सचिनच्या बायकोलाही पडला टिपिकल बायकांसारखा प्रश्न; म्हणाली, 'साडीचा...'