'मरिआई' पुलाच्या पाडकाम प्रक्रियेस सुरुवात, 14 डिसेंबरला होणार जमिनदोस्त
- Published by:Prachi Amale
- Reported by:Pritam Pandit
Last Updated:
शंभर वर्षे पूर्ण झालेल्या या पुलाला वाहतुकीसाठी धोकादायक मानत प्रशासनाने तो जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर: मध्य रेल्वेच्या विभागातील सोलापूर स्टेशनजवळील ब्रिटिशकालीन 1922 साली बांधलेला रोड ओव्हर ब्रिज अखेर येत्या रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने आज हा जुना पूल पाडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात येत आहे.यामुळे काल मध्यरात्रीपासून मरीआई चौक ते भय्या चौक हा मार्ग वर्षभरासाठी बंद असणार आहे.
1922 मध्ये मंगळवेढ्यापासून पंढरपूर, कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी येथे भैय्या चौकातील रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला होता. हा पूल शहराच्या विकासाचा साक्षीदार आहे. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या या पुलाला वाहतुकीसाठी धोकादायक मानत प्रशासनाने तो जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यायी वाहतूक व्यवस्था काय?
मरीआई चौक-शेटे नगर-एसटी स्टैंड,मरीआई चौक-नागोबा मंदिर स्टेशन आणि जगताप हॉस्पिटल नवीन रेल्वे बोगदा-जुना पुणे नाका या तीन पर्यायी अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.हे पोलिस सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत असणार आहेत.पुलावरील वाहतूक थांबविल्याने शहरातील वाहतूकीवर जास्त परिणाम होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेकडून 12 ठिकाणी फिक्स पाईंट ठेवण्यात आले आहेत.यामुळे वाहतूक शाखेवर ताण वाढल्याने जादा कर्मचाऱ्यांची मागणी वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. आधुनिक हायड्रोलिक ब्रेकर, काँक्रिट क्रशर व कटिंग मशीनच्या मदतीने हा पूल कमी वेळात पाडला जाणार आहे,
advertisement
का पाडला जाणार पूल?
रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिकांना भैय्या चौकातून शहरातील मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्थानक, रेल्वेस्थानक, नामवंत महाविद्यालय, शाळा हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या मार्गावरून विद्यार्थी, नोकरदार, शाळकरी विद्यार्थी यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी आदींना वाहतुकीसाठी महत्त्वाचा चौक आहे. मात्र, भैय्या चौक ते मरिआई चौक दरम्यान असणारा रेल्वे पूल धोकादायक बनल्याने ते पाडण्यात येणार आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 10, 2025 4:28 PM IST










