मार्गशीर्ष गुरुवारासाठी पूजेच्या वस्तू, फक्त 10 रुपयांपासून, कल्याणमध्ये हे आहे लोकेशन
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
मार्गशीर्ष महिना सुरू झाला की मार्केट भरगच्च भरतात. देवीच्या मुखवट्यापासून सजावटीपर्यंत महिलांचीही या व्रत-उपवासासाठी लगबग सुरू असते.
कल्याण : मार्गशीर्ष महिना सुरू झाला की मार्केट भरगच्च भरतात. देवीच्या मुखवट्यापासून सजावटीपर्यंत महिलांचीही या व्रत-उपवासासाठी लगबग सुरू असते. मार्केटमध्ये या वेळेत अनेक शॉपमध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या आकर्षित करत असतात. उद्यापनाला लागणाऱ्या वस्तू स्वस्त आणि मस्त असतील तर लोक तिकडे खरेदीला वळतात आणि यावेळी कमी भावात वस्तू मिळणे मुश्किल असते. मात्र तुम्ही कल्याणमधील मोहन मार्केटमध्ये पारस नोव्हेल्टी इथे फक्त 10 रुपयांपासून वस्तू खरेदी करू शकता.
देवी सजावट, ओट भरणीसाठी लागणारे हळदीकुंकू, करंडा, रुमाल, फुले, भांडी आदी वस्तू फक्त 10 रुपयांपासून या ठिकाणी मिळतात. त्यात जे देवीचे मुखवटे मार्केटमध्ये 200 रुपयांपासून स्टार्ट आहेत ते याठिकाणी फक्त 50 रुपयांपासून मिळतात. त्यामुळे या ठिकाणी येऊन तुम्ही स्वस्तात खूप छान खरेदी करू शकता. हे फक्त मार्गशीर्ष महिन्यातच बघायला मिळेल. पूर्ण मार्केट फिरून वेळ फुकट घालण्यापेक्षा या ठिकाणी येऊन तुम्ही अनेक वस्तू ज्या कमी रेंजमध्ये विकत घेऊ शकता.
advertisement
मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण दिवस आणि पूर्ण वेळ पारस नोव्हेल्टी ओपन असल्याने कोणत्याही वेळी जाऊन तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. काही महिलांना उद्यापनात वस्तू घेणे परवडत नाही, त्या सामान्य महिलांपासून सर्वांसाठी या दिवसात कमी भावात वस्तू देत असल्याचे परेश नागडा यांनी सांगितले.
advertisement
गेल्या 15 वर्षांपासून ते ही कमी भावात वस्तू देण्याची सेवा करत आहेत. मार्केटमध्ये 10 रुपये किंमत असेल तर ते 5 रुपयात या ठिकाणी देतात. त्यामुळे ग्राहक यावेळी मोठ्या प्रमाणात येऊन वस्तू खरेदी करतात. ग्राहकांचे समाधान हेच त्यांचे समाधान असल्याचे ते म्हणतात. त्यामुळे देवीसाठी खरेदी करण्यासाठी मोहन्यामध्ये या ठिकाणाला नक्कीच भेट देऊन बघा.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 10, 2025 4:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मार्गशीर्ष गुरुवारासाठी पूजेच्या वस्तू, फक्त 10 रुपयांपासून, कल्याणमध्ये हे आहे लोकेशन







