नाताळ, नववर्षासाठी मध्य रेल्वेचं गिफ्ट, मुंबई, पुण्यातून विदर्भासाठी 3 गाड्या, कुठून कुठं? पाहा वेळापत्रक

Last Updated:

Central Railway: मध्य रेल्वेने ख्रिसमस आणि नववर्षाआधीच प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबई-पुण्यातून विदर्भातील अमरावती, नागपूरसाठी तीन विशेष गाड्या धावणार आहेत.

Central Railway: नाताळ, नववर्षासाठी मध्य रेल्वेचं गिफ्ट, मुंबई, पुण्यातून विदर्भासाठी 3 गाड्या, कुठून कुठं? पाहा वेळापत्रक
Central Railway: नाताळ, नववर्षासाठी मध्य रेल्वेचं गिफ्ट, मुंबई, पुण्यातून विदर्भासाठी 3 गाड्या, कुठून कुठं? पाहा वेळापत्रक
अमरावती: नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 76 हिवाळी विशेष गाड्यांना मान्यता देण्यात आली आहे. याचा विदर्भ आणि मुंबई, पुणे विभागाला विशेष लाभ मिळणार आहे. बडनेरा मार्गे मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर आणि पुणे-अमरावती अशा साप्ताहिक विशेष गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच या गाड्यांसाठी 10 डिसेंबरपासून बुकिंग ही सुरू होणार आहे. बुकिंग सर्वच ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
मुंबई-नागपूर-मुंबई विशेष एकूण 6 फेऱ्या
गाडी क्रमांक 01005 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही विशेष सेवा 20 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत धावणार आहे. ही गाडी देखील शनिवारी 12.30 वाजता CSMT वरून सुटेल. गाडी क्रमांक 01006 ही नागपूर वरून त्याच कालावधीत असणार आहे. या गाडीच्या विशेष 6 सेवा असणार आहेत. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे कायम राहतील.
advertisement
पुणे-नागपूर विशेष एकूण 6 सेवा
गाडी क्रमांक 01401 पुणे ते नागपूर गाडी 19 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत, तर नागपूर–पुणे सेवा 20 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या दरम्यान चालेल. या गाडीच्या देखील विशेष 6 सेवा असणार आहेत. ही गाडी दौंड कॉर्ड लाइनमार्गे अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.
advertisement
अमरावती-पुणे-अमरावती विशेष 6 सेवा
गाडी क्रमांक 01403 आणि 01404 पुणे-अमरावती ही साप्ताहिक विशेष गाडी 20 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान धावणार आहे. 01404 ही गाडी दर रविवारी अमरावती येथून 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.15 ला पुण्यात पोहोचेल. 01403 ही गाडी 20 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत दर शनिवारी असणार आहे. दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड आणि चाळीसगावमार्गे ही सेवा देण्यात येईल.
advertisement
हिवाळी पर्यटन व सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय सुरू करण्यात आला आहे. या गाड्यांमुळे विशेषत: विदर्भातील नागरिकांना सुटसुटीत प्रवासाची अतिरिक्त सुविधा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
नाताळ, नववर्षासाठी मध्य रेल्वेचं गिफ्ट, मुंबई, पुण्यातून विदर्भासाठी 3 गाड्या, कुठून कुठं? पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
ZP Election Municipal Elections : निवडणुकांचा डबल बार उडणार! निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट, महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?
निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?
  • निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?

  • निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?

  • निवडणुकांचा डबल बार! महापालिकांसोबत किती जिल्हा परिषदांच्या निवडणुका?

View All
advertisement