हे काय आहे? थिएटरमध्ये Lokah फिल्म पाहायला गेली तरुणी, नको तेच करत बसली, Photo Viral, लोक संतप्त

Last Updated:

Woman used laptop in theatre watching Lokah Film : लोका फिल्म पाहायला तरुणी थिएटरमध्ये गेली. पण थिएटरमधील तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे आणि तिच्या फोटोमुळे वादही निर्माण झाला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : लोका फिल्म 28 ऑगस्टला रिलीज झाली. अनेक लोक ही फिल्म पाहायला जात आहेत. अशीच एक तरुणी जी ही फिल्म पाहायला थिएटरमध्ये गेली. पण थिएटरमधील तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे आणि तिच्या फोटोमुळे वादही निर्माण झाला आहे.
फिल्म थिएटरमध्ये आपण सामान्यपणे फिल्म पाहायला जातो. पण थिएटरमध्ये फिल्म पाहायला आलेली ही तरुणी असं काही करताना दिसली, हे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. याच थिएटरमध्ये फिल्म पाहायला आलेल्या एका प्रेक्षकाने या तरुणीचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यावर चर्चा होते आहे.
advertisement
फोटोत तुम्ही पाहू शकता. फिल्म थिएटरमध्ये एका सीटवर बसलेली ही तरुणी. जिच्या मागच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाने तिचा हा फोटो काढला आहे. तिच्या मांडीवर लॅपटॉप दिसतो आहे. व्यक्तीने पोस्टमध्ये सांगितल्यानुसार ही तरुणी फिल्म थिएटरमध्ये बसून ऑफिसचं काम करत होती.
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे फक्त बंगळुरूतच. लोका मुव्ही पाहायला गेलो आणि पुढच्या रांगेत बसलेल्या महिलेने तिचा लॅपटॉप उघडला आणि ऑफिसमध्ये काम करत अस्लयासारखं ती काम करू लागली, थिएटरमध्ये टायपिंग करू लागली. लोक 2 तासही ऑफिसच्या कामाच्या प्रेशरमधून निवांत राहू शकत नाही. हे काय आहे?
advertisement
पाहता पाहता हा फोटो खूप व्हायरल झाला. ज्यावर खूप कमेंट आल्या आहेत. कुणी या तरुणीला ट्रोल केलं आहे तर कुणी कंपनीला. टॉक्सिक वर्क कल्चरबाबत सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सिनेमा हा आनंद घेण्यासाठी आहे. जर तिथं बसूनही काम करायचं असेल तर एकतर कंपनी अत्यंत टॉक्सिक आहे किंवा कर्मचारी न कळवता फिल्म पाहायला आला आहे. ज्यामुळे तिला इथंही काम करावं लागत आहे, अशी कमेंट एका युझरने केली आहे.
मराठी बातम्या/Viral/
हे काय आहे? थिएटरमध्ये Lokah फिल्म पाहायला गेली तरुणी, नको तेच करत बसली, Photo Viral, लोक संतप्त
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement