advertisement

Pakistan Cricket : स्वत:च्या बाळाला संपवून पाकिस्तानी क्रिकेटरने केलं दुसरं लग्न! पहिल्या बायकोचे सनसनाटी आरोप

Last Updated:

Imad Wasim second marriage with Nyla Raja : पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर खेळाडू इमाद वसीम सध्या आपल्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. इमादने नायला राजा नावाच्या महिलेशी निकाह केल्याचे सोशल मीडियावर जाहीर केलं.

Imad Wasim second marriage with Nyla Raja
Imad Wasim second marriage with Nyla Raja
Imad Wasim ex wife Sannia Ashfaq : पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर खेळाडू इमाद वसीम सध्या आपल्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. इमादने नायला राजा नावाच्या महिलेशी निकाह केल्याचे सोशल मीडियावर जाहीर केलं. मात्र, या बातमीनंतर त्याची पहिली पत्नी सानिया अशफाक हिने इमादवर फसवणुकीचे गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सानियाने आपला संताप व्यक्त केला.
सानियाने इमादला 'धोकेबाज' म्हटले असून, पुराव्यांसह तो आता सर्वांसमोर उघड पडला असल्याचा दावा केला आहे. सानियाच्या मते, इमादने आपल्या मुलांचा विचार न करता हे पाऊल उचलले असून तिला आणि तिच्या मुलांना आता न्याय हवा आहे. वसीमची पहिली पत्नी सानिया अशफाकने इमादवर स्वतःच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला. वसीमला सानियापासून तीन मुले आहेत.
advertisement
दुसरीकडे, 37 वर्षीय इमाद वसीमने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पहिल्या लग्नानंतरचा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता. नायलामुळे त्याच्या आयुष्यात शांती आणि स्थैर्य आले असून आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे लग्न केले आहे. नायलावर होणारी टीका चुकीची असल्याचेही त्याने यावेळेस नमूद केले.
advertisement
इमाद आणि सानिया यांचा निकाह 2019 मध्ये झाला होता आणि त्यांना 3 मुले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. मात्र, सानियाने आता असा आरोप केला आहे की, या लग्नामुळे तिचे घर मोडले असून मुलांपासून त्यांचे वडील हिरावले गेले आहेत.
advertisement
दरम्यान, या वादात इमादने स्पष्ट केले की, तो आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहील. मात्र, सानियाने केलेल्या 'होमरेकर' आणि 'चीटर' या शब्दांच्या वापरामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. आता हे प्रकरण कायदेशीर वळण घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Cricket : स्वत:च्या बाळाला संपवून पाकिस्तानी क्रिकेटरने केलं दुसरं लग्न! पहिल्या बायकोचे सनसनाटी आरोप
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement