Amavasya: अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला म्हणून करतात या गोष्टी
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Bhutadi amavasya: काही पौर्णिमा आणि अमावास्या विशेष असतात. राखी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आदी तिथी शुभ आणि खास मानल्या जातात. तसंच सोमवती अमावास्या, शनी अमावास्या, सर्वपित्री अमावास्या याही विशेष मानल्या जातात. हिंदू धर्मात या दोन्ही तिथींचं वेगवेगळं महत्त्व आहे.
advertisement
advertisement
फाल्गुन महिन्यातली अमावास्या सोमवारी आहे. त्यामुळे ती सोमवती अमावास्या असेल. ही अमावास्या भूतडी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदा या दिवशी सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे ग्रहण सोमवारी रात्री नऊ वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि दोन वाजून 22 मिनिटांनी ग्रहण सुटेल. भूतडी अमावास्येला सूर्यग्रहण असणं समस्या वाढवणारं मानलं जातं.
advertisement
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, भूत याचा अर्थ मागच्या काळात होऊन गेलेली गोष्ट होय. एखादी अशी व्यक्ती जिचा मृत्यू झालेला असून ती भूतकाळात गेलेली आहे, तसंच अतृप्त, अनोळखी आत्मे किंवा कुटुंबातल्या ज्यांचा अकाली मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, असे सदस्य किंवा नातेवाईकांचा आत्मा होय. असे आत्मे भूतडी अमावास्येला आपल्या कुटुंबातले सदस्य किंवा अनोळखी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, असं म्हटलं जातं. हे आत्मे नेहमीच असं करू शकत नाहीत; पण या दिवशी त्यांना विशेष बळ प्राप्त होतं आणि ते कमजोर व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
advertisement
त्यामुळे आपल्या नाराज पितरांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी ही तिथी योग्य मानली जाते. त्यांच्या इच्छांकडे दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे या दिवशी पितरांचं स्मरण आणि दानधर्म करावा.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)