गरुड पुराणानुसार, जो पुरुष आपल्या पतिव्रता पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवतो, त्याला मृत्यूनंतर यमलोकात अत्यंत कठोर यातना दिल्या जातात. या पापांच्या श्रेणीनुसार आत्म्याला वेगवेगळ्या नरकात पाठवले जाते. तप्तसूर्मि नावाच्या नरकात अशा पापी लोकांना ठेवले जाते, ज्यांनी वासनेपोटी सर्व मर्यादा ओलांडलेल्या असतात. येथे व्यक्तीच्या आत्म्याला तापलेल्या लाल लोखंडाच्या अगणित सुयांनी टोचले जाते, ही पीडा सहन करण्याच्या पलीकडे असते.
advertisement
खुश व्हा! मकर संक्रातीची पहिली गोड बातमी 3 राशीच्या लोकांना; सूर्य-शनिची कृपा
विश्वासघात करणाऱ्या आत्म्यांना अंधतमिस्त्र नावाच्या काळोख्या नरकात ढकलले जाते. येथे व्यक्तीला कित्येक मैलांपर्यंत अणकुचीदार काटे आणि विषारी प्राण्यांनी भरलेल्या वाटेवरून अनवाणी चालायला लावले जाते. दाट अंधारामुळे रस्ता दिसत नाही, ज्यामुळे तो वारंवार पडतो आणि जखमी होतो. तसेच व्रजदंश नरकात लोखंडासारखे मजबूत आणि अणकुचीदार दात असलेले भयानक प्राणी पापी व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडतात आणि त्याला चावतात. जोपर्यंत कर्मांचा हिशोब पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही शिक्षा सुरूच राहते.
2026 सालातच भाग्य उजळणार; फेब्रुवारीच्या या तारखेपासून 4 राशींचा गोल्डन काळ!
गरुड पुराणात केवळ विश्वासघातच नाही, तर पत्नीवर केलेला मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुद्धा महापाप मानला गेला आहे. जो माणूस आपल्या पत्नीचा छळ करतो किंवा तिच्यावर हात उचलतो, त्याला रौरव नरकाच्या आगीत फेकून दिले जाते. शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला आयुष्यभर जितके कष्ट दिले असतील, यमदूत त्यापेक्षा हजार पटीने जास्त कष्ट त्या व्यक्तीला देतात. ही शिक्षा काही दिवसांची नसून हजारो वर्षांपर्यंत चालते. जोपर्यंत आत्मा आपल्या पापांचे फळ भोगत नाही, तोपर्यंत त्याला पुढचा जन्म किंवा मुक्ती मिळत नाही.
