अंतिम संस्कारात मुखाग्नीचं महत्त्व
असं मानलं जातं की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचे अंतिम संस्कार योग्य पद्धतीने केल्यावरच त्याच्या आत्म्याला शांती मिळते. या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुखाग्नी, म्हणजेच मृतदेहाला अग्नी देणे. हे काम पारंपरिकरित्या मुलाच्या हस्ते केले जाते.
'पुत्र' शब्दाचा अर्थ आणि धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, "पुत्र" म्हणजे - जो मृत्यूनंतरही आपल्या आई-वडिलांना मार्गदर्शन करतो. अशीही श्रद्धा आहे की 'पुत्र' हा दोन अक्षरांनी बनलेला आहे - 'पु' म्हणजे नरक आणि 'त्र' म्हणजे तारणारा. म्हणजेच, पुत्र तो असतो जो आपल्या आई-वडिलांना मृत्यूनंतरच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींपासून वाचवतो. याच विचारानुसार ही जबाबदारी मुलाला देण्यात आली होती.
advertisement
पूर्वी मुलींना नव्हते अधिकार
प्राचीन काळात समाजाची रचना काहीशी वेगळी होती. त्या काळात मुलींना जास्त अधिकार नव्हते. त्यांना घराबाहेर पडण्याचं, निर्णय घेण्याचं किंवा सामाजिक कार्यात भाग घेण्याचं स्वातंत्र्य कमी होतं. त्यामुळे मुलींसाठी अंतिम संस्कारासारखी कामं करणं योग्य नाही, असंही मानलं गेलं. हा विचार हळूहळू एक परंपरा बनली.
मुलगा असतो घराचा वारसदार
आणखी एक गोष्ट अशी मानली जाते की, मुलगा हा घराचा वारसदार असतो, तोच घराण्याची परंपरा पुढे नेतो, त्यामुळे मृत्यूनंतरची जबाबदारीही त्याचीच असते. पण वेळेनुसार परिस्थितीत बदल झाला आहे. आता मुलीही पूर्ण जबाबदारीने आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. अनेकदा मुली आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात आणि त्यांच्या मृत्यूनंतरचे अंतिम संस्कारही पूर्ण करतात.
आता मुलीही करत आहेत अंतिम संस्कार
आजच्या काळात कायदा आणि समाज दोघांनीही हे मान्य केलं आहे की मुलीसुद्धा अंतिम संस्कार करू शकतात. अनेक शहरांमध्ये मुली आपल्या आई किंवा वडिलांच्या चितेला अग्नी देतात आणि समाजही आता याकडे आदराने पाहू लागला आहे. हळूहळू परंपरा बदलत आहेत आणि लोक भावनांना अधिक महत्त्व देत आहेत.
हे ही वाचा : बाथरुममधील रिकामी बादली तुम्हाला करू शकते कंगाल, आजच बदला ही सवय; अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम!
हे ही वाचा : घरातील 'या' 4 वस्तुंमुळे मिळत नाही यश, आत्ताच काढून टाका, नाहीतर आयुष्यभर रहाल गरिबीत!