बाथरुममधील रिकामी बादली तुम्हाला करू शकते कंगाल, आजच बदला ही सवय; अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू आणि दिशा महत्त्वाची असते. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणं वास्तुदोषाचं एक प्रमुख कारण मानलं जातं. डॉ. अरविंद पचौरी यांच्या मते, यामुळे आर्थिक नुकसान, पैशाच्या आवकात अडथळा, तसेच...
वास्तूशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्याचं स्वतःचं महत्त्व आहे. इथे ठेवलेल्या गोष्टी योग्य प्रकारे ठेवल्या आहेत की, अयोग्य प्रकारे, त्याचा तुमच्या जीवनावर नक्कीच परिणाम होतो. कधीकधी काही गोष्टींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. म्हणूनच वास्तू नेहमी दिशा आणि वस्तूंच्या देखभालीवर जोर देते. साधारणपणे, जेव्हा वास्तुदोषाचा विषय येतो, तेव्हा लोकांचं लक्ष किचन, हॉल, बेडरूम, पूजा रूमकडे जातं. पण आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुदोष केवळ याच ठिकाणी नाही, तर तुमच्या बाथरूममध्येही असू शकतो.
बाथरूममधील रिकामी बादली ठरते अशुभ!
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादलीसुद्धा वास्तुदोषाचं कारण बनू शकते. अनेकदा लोक आंघोळ झाल्यावर बादली रिकामीच ठेवतात. पण रोज होणारी ही चूक तुम्हाला मोठं नुकसान पोहोचवू शकते. कारण यामुळे तुमच्या आनंदी कुटुंबाला समस्या घेरतील आणि तुम्हाला त्याची जाणीवही होणार नाही. चला तर मग ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार डॉ. अरविंद पाचोली यांच्याकडून बाथरूमशी संबंधित काही वास्तू टिप्स जाणून घेऊया...
advertisement
बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने होतं आर्थिक नुकसान
वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने गरिबी येते. यामुळे घरात पैशाच्या आगमनात अडथळे येतात आणि आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते. हे दर्शवते की तुमची ऊर्जा पैसा जमा करण्यात नव्हे, तर अनावश्यक खर्चात खर्च होत आहे.
आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम
आरोग्य केवळ अन्न आणि दिनचर्येमुळेच नाही, तर आजूबाजूच्या वातावरणामुळेही प्रभावित होतं. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने आजार येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार या सवयीमुळे घरात इन्फेक्शन, थकवा आणि वारंवार आजारी पडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
हे ही वाचा : Monday Born People: सोमवारचा जन्म? एका जागेवर, एका कामावर स्थिर राहणार कसे; नशीब उजळायला..
हे ही वाचा : काही झालं तरी या 5 लोकांच्या मृतदेहांचं काशीत दहन होत नाही, स्मशानातून परत जातात डेडबॉडी
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 14, 2025 10:58 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
बाथरुममधील रिकामी बादली तुम्हाला करू शकते कंगाल, आजच बदला ही सवय; अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम!


