advertisement

US Iran Conflict: व्हाईट हाऊसमध्ये ज्यांना सुनावलं, त्याच राष्ट्राध्यक्षांकडे ट्रम्प यांनी मदतीसाठी हात पसरले

Last Updated:

US Iran Conflict: युद्धात इतर महत्त्वाच्या देशांनी अमेरिकेला साथ न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने ट्रम्प कोंडीत अडकले आहेत. अशातच आता ज्यांना व्हाईट हाऊसमध्ये सुनावलं, त्याच राष्ट्राध्यक्षांकडे ट्रम्प यांनी मदतीसाठी हात पसरले आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये ज्यांना सुनावलं, त्याच राष्ट्राध्यक्षांकडे ट्रम्प यांनी मदतीसाठी हात पसरले
व्हाईट हाऊसमध्ये ज्यांना सुनावलं, त्याच राष्ट्राध्यक्षांकडे ट्रम्प यांनी मदतीसाठी हात पसरले
Iran US Conflict: अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात पुकारलेल्या युद्धाला सात दिवस होत असताना मोठी घडामोड घडली आहे. इराणच्या कडव्या प्रतिकाराने अमेरिका आणि इस्रायल हतबल झाले असल्याचे चित्र आहे.इराणने ड्रोन, क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून आखाती देशात असलेले अमेरिकेच्या तळावर जोरदार हल्ले केले आहेत. तर, इस्रायलची राजधानी तेल अवीववरही बॉम्ब हल्ले सुरू ठेवले आहेत. या युद्धात इतर महत्त्वाच्या देशांनी अमेरिकेला साथ न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने ट्रम्प कोंडीत अडकले आहेत. अशातच आता ज्यांना व्हाईट हाऊसमध्ये सुनावलं, त्याच राष्ट्राध्यक्षांकडे ट्रम्प यांनी मदतीसाठी हात पसरले आहेत.
रशियासोबत युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांसमोरच डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्सकी यांचे खटके उडाले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्सकी यांना अमेरिका देत असलेल्या मदतीवर भाष्य केले. झेलेन्सकी यांचा हा अपमान असल्याची टीका त्यावेळी करण्यात आली.
advertisement
इराणच्या 'शाहेद' (Shahed) ड्रोनने अमेरिका-इस्रायलची झोप उडवली आहे. आता, या ड्रोनचा सामना करण्यासाठी अमेरिकेने थेट युक्रेनला साकडं घातलं असल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियन ड्रोनचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या युक्रेनच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी आता अमेरिका आणि पश्चिम आशियातील अनेक देश सरसावले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्वतः या प्रकरणाचा भाष्य करत सांगितले की, अनेक देशांनी इराणी ड्रोनपासून संरक्षण मिळवण्यासाठी युक्रेनकडे तांत्रिक मदतीची मागणी केली आहे.
advertisement
नुकत्याच झालेल्या चर्चेत झेलेन्स्की यांनी संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार, बहरीन, जॉर्डन आणि कुवेत या देशांच्या प्रमुखांशी या संभाव्य सहकार्याबाबत संवाद साधला आहे. रशियाने गेल्या चार वर्षांत युक्रेनवर हजारो शाहेद ड्रोन डागले आहेत, ज्यामुळे युक्रेनकडे या ड्रोनना हवेतच रोखण्याचे आणि नष्ट करण्याचे प्रगत युद्धकौशल्य प्राप्त झाले आहे. आता याच कौशल्याची गरज आखाती देशांना भासत आहे, इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे या भागातही अशाच प्रकारच्या ड्रोन हल्ल्यांचा धोका वाढला आहे.
advertisement

मदतीला तयार पण युक्रेनची अट...

मात्र, ही मदत पुरवताना झेलेन्स्की यांनी काही अटीही समोर ठेवल्या आहेत. युक्रेनची स्वतःची सुरक्षा व्यवस्था कमकुवत होणार नाही, याची खात्री पटल्यानंतरच हे सहकार्य दिले जाईल. तसेच, जे देश रशियासोबतचे युद्ध न्याय्य मार्गाने संपवण्यासाठी युक्रेनला राजनैतिक पाठबळ देतील, त्यांनाच ही मदत प्राधान्याने दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
दुसरीकडे, पश्चिम आशियातील ताज्या संघर्षामुळे जगाचे लक्ष युक्रेनमधील युद्धावरून विचलित झाले आहे. यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने होणारी महत्त्वाची शांतता चर्चाही तूर्तास लांबणीवर पडली आहे. युक्रेनच्या संसदीय समितीचे प्रमुख ओलेक्सांद्र मेरेझको यांनी इशारा दिला आहे की, रशिया आणि इराण हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र असून ते एकमेकांना शस्त्रे आणि तंत्रज्ञान पुरवत आहेत. त्यामुळे या दोन्ही युद्धांकडे स्वतंत्रपणे न पाहता एक 'एकमेकांशी जोडलेले संकट' म्हणून पाहावे लागेल.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
US Iran Conflict: व्हाईट हाऊसमध्ये ज्यांना सुनावलं, त्याच राष्ट्राध्यक्षांकडे ट्रम्प यांनी मदतीसाठी हात पसरले
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement