advertisement

Mumbai: घरात कुणी नसताना साधायचा डाव, नराधमाचं पोटच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य, 6 महिने नरकयातना

Last Updated:

Mumbai News: मुंबईच्या कांदिवली परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबईच्या कांदिवली परिसरात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका विकृताने आपल्या १३ वर्षीय लेकीवर वारंवार अत्याचार केला आहे. आरोपी मागील सहा महिन्यांपासून तिचं लैंगिक शोषण करत होता. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी ४० वर्षीय नराधम पित्याला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यांपासून सुरू होता छळ

मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पासून ते २ मार्च २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत हा अघोरी प्रकार सुरू होता. घरात कोणीही नसताना आरोपी पिता आपल्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून अश्लील चाळे करायचा. नराधम बापाने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पित्याकडून होणाऱ्या या मानसिक आणि शारीरिक शोषणाने मुलगी पूर्णपणे खचली होती.
advertisement

पीडितेने दाखवले धाडस

वडिलांच्या सततच्या त्रासाला आणि अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने मंगळवारी धाडस दाखवलं. तिने थेट समतानगर पोलीस ठाणे गाठून आपल्यावर ओढवलेला हा भयाण प्रसंग पोलिसांना सांगितला. आपल्याच पित्याविरुद्ध तिने तक्रार नोंदवली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी ४० वर्षीय आरोपी पित्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह 'पोक्सो' (POCSO - लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच समतानगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: घरात कुणी नसताना साधायचा डाव, नराधमाचं पोटच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य, 6 महिने नरकयातना
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement