इंदोर : श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय तसतसा भाविकांचा आनंद द्विगुणीत होतोय. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या कणाकणात श्रीरामांचा वास आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळेच अयोध्येत आतापासूनच भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावू लागले आहेत. विशेष म्हणजे हे भाविक केवळ हिंदू नाहीत बरं का, तर विविध धर्मीय रामभक्तांचा यात समावेश आहे. मुंबईच्या शबनम शेखदेखील त्यापैकीच एक, ज्या चक्क बुरखा घालून हातात मारुतीरायांचा ध्वज घेवून पायी अयोध्येला निघाल्या आहेत.
advertisement
धर्म, जात-पात ही सारी बंधनं ओलांडून शबनम या केवळ भगवान श्रीरामांवरील आपल्या प्रेमापोटी मुंबई ते अयोध्या असं जवळपास 1600 किलोमीटरचं अंतर पायी पार करणार आहेत. त्यांच्यासोबत या प्रवासात त्यांचे काही सहकारीदेखील सहभागी आहेत. दरम्यान, श्रीरामांवरील त्यांची श्रद्धा पाहून अगदी वाटसरूसुद्धा हैराण होतात. अखेर आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे हेच खरं.
राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचं पुणे कनेक्शन, 'या' ज्योतिषानं सांगितला शुभ मुहूर्त
हवनात झाल्या सहभागी
मुंबईच्या रहिवासी असलेल्या शबनम शेख यांनी रमन शर्मा आणि विनीत पांडे या आपल्या सहकाऱ्यांसह या प्रवासाला सुरूवात केली. 31 डिसेंबरला त्या मध्य प्रदेशच्या इंदोरमधील मानपूर भागात दाखल झाल्या. तेव्हा मां वैष्णो देवी सेवा समितीकडून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. समिती सदस्यांच्या आग्रहाखातर शबनम या मंदिरातील हवनमध्ये आनंदाने सहभागी झाल्या. त्यावेळी 30 मिनिटे हनुमान चालीसेचं पठणही करण्यात आलं. त्यानंतर त्या जेव्हा पुढील प्रवासाला निघाल्या तेव्हा मंदिर परिसर 'भारत माता की जय, वंदे मातरम, नारी शक्ती जिंदाबाद' या घोषणांनी दुमदुमून निघाला. तर, 'मंदिरात मिळालेली सकारात्मक ऊर्जा मला अयोध्येपर्यंतच्या प्रवासात उपयुक्त ठरेल', असं शबनम म्हणाल्या.
राम मंदिरासाठी काही दान करायचंय पण माहिती नाही कसं करावं, ही घ्या माहिती...
21 डिसेंबरला सुरू झाला प्रवास
शबनम यांनी सांगितलं की, या प्रवासाची 21 डिसेंबरला सुरूवात केली. अयोध्येच्या श्रीराम मंदिरात पायी जायचं आधीच ठरलं होतं, परंतु त्यासाठी एवढं संरक्षण मिळेल याचा विचारही केला नव्हता. या प्रवासात पोलिसांकडून चांगलं सहकार्य मिळतंय. पावला-पावलावर लोक आमच्यासोबत जोडले जात आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीये, प्रवास अगदी सुरळीत सुरू आहे. विशेष म्हणजे शबनम म्हणाल्या की, त्यांचा जन्म जरी मुस्लिम कुटुंबात झाला असला तरी त्यांच्या घरी रामायण आणि गीतेचं पठण होतं.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g