रांची : घर बांधताना देवघर नेमकं कुठं असावं, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण हे ठिकाण म्हणजे घरातली सर्वात पवित्र जागा मानली जाते. त्यात जरा जरी चूक झाली, तरी आर्थिक, आरोग्य, अशा सर्वच दृष्टीने घरातील व्यक्तींना नुकसान सहन करावं लागू शकतं.
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात नैऋत्य दिशेत चुकूनही देवघर नसावं. कारण इथं देवाची पूजा केल्यास घरातल्या सर्व सदस्यांना अडचणी सहन कराव्या लागतात. देवघर हे कायम ईशान्य दिशेतच असावं. या दिशेत देवांचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे या दिशेतूनच घरात सकारात्मक ऊर्जेचं आगमन होतं.
advertisement
इथं मकर संक्रांतीला आई मुलाला देते तीळगूळ आणि घेते वचन; अत्यंत खास आहे परंपरा!
नैऋत्य दिशेत चुकूनही करू नका पूजा
ज्योतिषांनी सांगितलं की, नैऋत्य दिशेला पितरांचं घर मानलं जातं. त्यामुळे इथं नकारात्मक ऊर्जा असते. इथं देवघर असेल तर घरातल्या सर्व व्यक्तींना आजारपणाला सामोरं जावं लागतं. शिवाय आर्थिक नुकसानही होऊ शकतं. सर्वांचं मनही अस्थिर होतं, त्यामुळे कामं पूर्ण होत नाहीत. शिवाय घरात कायम वाद होतात. त्यामुळे घरात देवघर उभारण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्या.
हुश्श...! 500 वर्षांनी आला योग, 'या' 3 राशींच्या व्यक्तींसाठी आता यश दूर नाही
कारण देवांबाबत एकदा केलेली चूक सहजासहजी सावरता येत नाही. ती लक्षात येईपर्यंतच घरात नकारात्मक ऊर्जेचं आगमन झालेलं असतं आणि त्यासह घराची शांतताही भंग झालेली असते.
ईशान्य दिशेत करावी देवपूजा
ज्योतिषांनी सांगितलं की, ईशान्य दिशेला अत्यंत शुभ मानलं जातं. इथून ब्रह्मांडातल्या सकारात्मक ऊर्जेचा घरात प्रवेश होतो, असं मानतात. या दिशेला सकारात्मक ऊर्जेचं द्वारही म्हटलं जातं. त्यामुळे या दिशेत देवपूजा केल्याने ही ऊर्जा आणखी वाढते आणि घरात सुख, समृद्धी, शांती नांदते. मुख्य म्हणजे घरात लक्ष्मी देवीचा वास निर्माण होतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g