दुखापत
28 वर्षीय डावखुरा सलामीवीर गायकवाडला 30 मार्च रोजी गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी झाली आणि अखेर त्याला संपूर्ण हंगामातून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.
चेन्नईला मोठा सेटबॅक, ऋतुराज गायकवाड IPL 2025 मधून बाहेर; धोनी CSKचा कॅप्टन
कर्णधारपद पुन्हा धोनीकडे
गायकवाडच्या अनुपस्थितीत अनुभवी महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. धोनीचं नेतृत्व असलेल्या CSKने आतापर्यंत अनेकदा यशस्वी कामगिरी केली आहे. त्यामुळे कर्णधाराच्या भूमिकेत धोनीची पुनरागमन ही संघासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.
advertisement
मोठी पोकळी
गायकवाडने या हंगामात पाच सामने खेळत 122 धावा केल्या होत्या. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात CSK ला फक्त एकाच विजयाची नोंद करता आली. त्यामुळे फलंदाजी विभागात त्याची अनुपस्थिती मोठी वाटणार आहे.
RBIच्या नावाने तुम्हाला आला आहे का Whatsapp मेसेज?
ऋतुराजची जागा कोण?
संघात आता त्याच्या जागी कोण सामील होणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. खालील तिघांची नावं चर्चेत आहेत:
पृथ्वी शॉ: मुंबईचा 25 वर्षीय आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉला IPL 2025 च्या लिलावात कोणी खरेदी केले नव्हते. दिल्ली कॅपिटल्सकडून 2018 ते 2024 पर्यंत खेळलेल्या पृथ्वीने 79 सामन्यांत 1892 धावा केल्या आहेत. तो CSK ला आक्रमक सुरुवात देऊ शकतो.
मयांक अगरवाल: RCB, दिल्ली, पुणे, पंजाब आणि SRH कडून खेळलेल्या 34 वर्षीय मयांकने IPL मध्ये 127 सामन्यांत 2661 धावा केल्या आहेत. तो सलामीसोबत क्रमांक 3 वरही फलंदाजी करू शकतो. त्याचा अनुभव CSK साठी मोलाचा ठरू शकतो.
आयुष म्हात्रे: 17 वर्षीय युवा फलंदाज आयुष म्हात्रे याला चेन्नई फ्रँचायझीकडून मिड-सिझन ट्रायलसाठी बोलावण्यात आले आहे. मुंबईचा हा प्रतिभावान फलंदाज 9 फर्स्ट क्लास आणि 7 लिस्ट A सामने खेळला आहे. त्याच्या निवडीवर सर्वांचे लक्ष आहे.
CSK पुढचा सामना
CSK आपला सहावा साखळी सामना 11 एप्रिल रोजी चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात रुतुराजच्या जागी कोण खेळेल याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. तसेच धोनीच्या नेतृत्वात CSK पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतू शकतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.