Ruturaj Gaikwad: चेन्नईला मोठा सेटबॅक, ऋतुराज गायकवाड IPL 2025 मधून बाहेर; धोनी CSKचा कॅप्टन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ruturaj Gaikwad IPL 2025: सलग चार पराभव स्विकारणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला एक मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या 18व्या हंगामातून बाहेर पडला आहे.
चेन्नई: पाच वेळा आयपीएल विजेता ठरलेली चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघासाठी 18व्या हंगामात एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा सध्याचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाबाहेर गेला आहे. त्यामुळे आगामी सामने आता महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली खेळवले जाणार आहेत.
ऋतुराज गायकवाडची दुखापत गंभीर
सीझनच्या सुरुवातीपासूनच ऋतुराजने दमदार कामगिरी केली होती. मात्र अलीकडील सामन्यांदरम्यान त्याच्या कोपराला गंभीर इजा झाली. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे तो उर्वरित आयपीएल 2025 हंगामात सहभागी होऊ शकणार नाही.
धोनी पुन्हा नेतृत्वात
ऋतुराजच्या अनुपस्थितीत संघाचा भार आता पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर आला आहे. ऋतुराज हा संघाचा प्रमुख फलंदाज असून त्याची गैरहजेरी CSK साठी मोठं आव्हान ठरणार आहे. मात्र धोनीच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना नव्याने उभारी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
पुढील सामने अधिक महत्त्वाचे
ऋतुराजच्या गैरहजेरीत संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. CSK सध्या प्ले-ऑफच्या शर्यतीत असून प्रत्येक सामना निर्णायक ठरणार आहे.
कर्णधारपद सोडल्यानंतर पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याची धोनीची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2022 मध्ये देखील असे झाले होते. तेव्हा धोनीने 2021च्या हंगामानंतर कर्णधारपद सोडले होते. आणि रविंद्र जडेजाकडे नेतृत्व दिले होते. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खराब झाली होती. ज्यामुळे त्याने हंगामाच्या मध्ये कर्णधारपद सोडले आणि पुन्हा धोनी कर्णधार झाला.
advertisement
चेन्नईच्या आतापर्यंतच्या लढती
मुंबईवर 4 विकेटनी विजय
आरसीबीकडून 50 धावांनी पराभव
राजस्थानकडून 6 धावांनी पराभव
दिल्लीकडून 25 धावांनी पराभव
पंजाबकडून 18 धावांनी पराभव
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 10, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ruturaj Gaikwad: चेन्नईला मोठा सेटबॅक, ऋतुराज गायकवाड IPL 2025 मधून बाहेर; धोनी CSKचा कॅप्टन